द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Published Books - प्रकाशित पुस्तके

 लेखक - द. स. काकडे, कादंबरी
कादंबरी क्रमांक 061 ते 079
अगोदरचे पान - कादंबरी क्र. (001 ते 020) - (021 ते 040) - (041 ते 060) - (061 ते 079)

अनु. क्र.

मुखप्रुष्ठ

पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष प्रकाशक प्रुष्ठ संख्या
061 घमंडी 2003 पायल पब्लिकेशन, पुणे. 281
कादंबरी घमंडी - प्रसिध्दी २००३ : पायल पब्लिकेशन्स, पुणे.

घमंडी डिगरीवाला वकिल नसला तरी अनेक वकिलांचा तो कायदेशीर बाबतीत बाप होता. जमीन वाटपाची भांडणं, घरगुती भांडणं, नवरा मेलेल्या विधवेच्या हक्काची भांडणं, जमिनीच्या हद्दीची भांडणं ..सा-या भांडणाची पोतडी घमंडीकडे असे. त्याची ही गावठी वकिली पाहून कोर्टातले वकिल त्याला जवळ करीत. म्हणत घमंडी, तू आम्हाला कोर्टासाठी अशिल आणून दे. तुला दोन टक्के फी मिळत जाईल.

घमंडीला नव-यानं टाकलेली शालू भेटली. तिचं गणित त्याला स्वत:लाच सोडवायचं होतं. तिच्या अंगावरचे दागिने पाहून तर त्याचे डोळे लकाकले. त्याचा श्वास वाढला. तिला कोर्टबाजीत अडकवून तो तिच्याशी खेळ करणार होता.

लोकप्रिय कादंबरीकार बाबा कदम यांना आबडलेली ही कादंबरी. त्यांनी पत्र पाठवून द.स.काकडे यांचे कौतुक केलेले आहे. ते लिहीतात- प्रिय काकडे, तुम्ही एक इरसाल माणुसकी हरवलेल्या चेंगट, कवडीचुंबक, पाषाणहृदयी माणसाची व्यक्तिरेखा घमंडीत रंगवलेली आहे. खेड्यातील वातावरण, भाषा अस्सल आहे. तुम्ही मुंबईत राहाणारे लेखक पण तुमच्या कादंबरीला खेड्यातील मातीचा अस्सल वास आहे, कारण तुम्ही अस्सल ग्रामीण लेखक आहात.

062

बुलबुल्या 2002 पार्टनर पब्लिकेशन, विरार, ठाणे. 286
कादंबरी - बुलबुल्या - प्रसिध्दी २००२: पार्टनर पब्लिकेशन्स, मुंबई.

बुलबुल्या नाव ठेवा की गोजाबाईनं नाव सुचवलं. पाळण्यात रडणार्या पोरानं बुलबुल्या नाव ऐकताच रडणं थांबलं. ते हसाय लागलं. तोंडाचं बोळकं दाखवाय लागलं.
गोजाबाय, तुला पोराचं नाव बुलबुल्या कसं ठेवावसं वाटलं. पोराची आई बोलली.
मला धा पोरं झाली. धा पोरांची नावं मी नाय ठेवली माझ्या पैलवान नवर्यानं ठेवली.
म्हंजी पैलवान नवरा चांगला पंचाग बघणारा बाम्हण म्हणायचा
पंचागी बाम्हण कसला? त्यानं कुस्तीत आतापर्यंत जेवढे पैलवान पाडले. त्या समद्यांची नावं त्यानं आमच्या पोरांना ठेवली. त्यातल एका पैलवानाचं नाव बाकी होते. पण मी धा पोरानंतर पोर होऊ धिलं नव्हतं.
असं! मंजी तुमच्या अकराव्या पोराला जे बुलबुल्या नाव धिलं गेलं असतं ते ह्या आमच्या रडणार्या पोराला धिलं, म्हणा की, गोजाबाय. बुलबुल्याची आई बोलली.
- तर अशा ह्या बुलबुल्याची गमतीदार कहाणी ह्या कादंबरीत इरसालपणे मांडली आहे.

063 दत्तक 2003 ज्ञानदत्त प्रकाशन, पुणे. 160
कादंबरी दत्तक - प्रसिध्दी जून,२००३ - ज्ञानदत्त प्रकाशन, पुणे

एक इरसाल ग्रामीण कथानक असलेली कादंबरी.
एक चेअरमन - त्याच्या दोन बायका. दोन्ही निपुत्रिक - म्हणून त्यानं ठेवलं एक अंगवस्त्र! नेमका अंगवस्त्रालाच झाला एक मुलगा. तोच ठरला चेअरमनचा वारीसदार. पण त्याच्या दोन बायका, चार मुली. त्यांचे नवरे, बाकी भाऊबंद, पै पाहुणे...
त्यांच्या पेच डावपेचातून चेअरमनला सुटता सुटता नाकी नऊ येतात. अखेर चेअरमनच्या बायकांच्या कारवाया पाहून चेअरमन आपल्याच मुलाला दत्तक म्हणून स्वीकारतो. असा गुंता सुटतो - पण हा गुंता कसा कसा सुटतो त्याची ही इरसाल कहाणी.

064 सुत्रधार 2003 सत्यजय प्रकाशन, मुंबई. 196
सुत्रधार - प्रसिध्दी २००३ : सत्यजय प्रकाशन, मुंबई - लोकनेता- नवेरूप - प्रसिध्दी २००९ अजब पब्लिकेशन्स, कोल्हापूर

सहकारी साखर कारखानदारीतील गटातटाचे राजकारण चेअरमन, संचालकमंडळातील खो खो चा चाललेला एकमेकाला उठवण्याचा खेळ. त्यात बळी तो किंग. ग्रामीण राजकारणाचे चित्रदर्शी पध्दतीने लेखकाने खेळवले आहे. एकमेकांचे पाय ओढणारे ग्रामीण भागातील तथाकथीत पुढारीच सुत्रधाराचे खेिळले झाले आहेत. बलात्कारीत रत्ना, धीट वृत्तीची माधवी, खासदारांचे जावई आणि सत्ताधीशांच्या घरात बंदिस्त असलेल्या मूक स्त्रीया या सार्यांचे प्रखर चित्रण मनाला अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाही.

065 नागसर्प 2006 वैशाली प्रकाशन, पुणे. 184
कादंबरी - नागसर्प - प्रसिध्दी १ जून, २००६ : वैशाली प्रकाशन, पुणे.

सईबाई, गोपाळा तुमच्याशी कसा खेळला आहे हे आज तुम्हाला समजले आहे. आता तो मंजुळेच्या जिंदगीशी खेळायला निघालाय. तुमच्या घरदार शेतीवाडीच्या हिश्श्यावर जसा त्याचा डोळा आहे. तसा आता मंजुळाचं लग्न करताना किती पैसा हातात मिळतोय हा डाव खेळतोय तो. गोपाळ हाच खरा नागसर्प - हे सर्वांना कळून चुकतं. बहिणीची इस्टेट आपल्याला मिळावी म्हणून विहिरिच्या पाण्यात पोहणार्या मेहुण्यावर नागसर्प सोडणारा गोपाळा... त्याचा तोच नागसर्पाचा खेळ त्याच्यावर उलटविणारा सपेरा तिरम्याबाबा...गÈयाला विळखा मारून दंश करणार्या नागसर्पाची ही कहाणी वाचावी अशी.

066 डागळलेली कैरी 2004 पार्टनर पब्लिकेशन, विरार, ठाणे. 115
प्रसिध्दी एप्रील 2004, पार्टनर पब्लिकेशन्स, मुंबई.

कडेलोट धरणावर ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम करणा-या मोहन इंजिनिअर आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या चीफ इंजिनिअर पानसे साहेबांच्या देखण्या मॅडमची ही धमाकेबाज कथा.
कुकडी जलाशयाच्या काठावर उभ्या असलेल्या मोहन मागे पावलं वाजली. मोहनने वळून पाहिलं तर मॅडम.
"ह्या यमुना जलावर कोणा राधेची वाट पाहता काय?"
"र .. र.. राधा ..?"
"असं काय म्हणता? तुमचं नाव राधा ना?"
"तुम्ही मोहन .. मी राधा .."
"तुम्ही पानसे साहेबांच्या राधा मॅडम ना?"
ती हसतच त्याच्याकडे बघत राहिली.
आपण ह्या कुकडी धरण जलावर कोणा राधेची नाही तर काव्यलेखनात डुंबत बसण्यासाठी इथे आलेलो आहोत, हे हिला सांगायला हवं.
उत्तरोत्तर रंगत जाणारी रंगीन कथा.

067 स्त्री जन्म 2005 पायल पब्लिकेशन, पुणे. 206
प्रसिध्दी 2005, पायल पब्लिकेशन्स, पुणे.

तांबडसांज झाली.
पश्चिम दिशेला रंग उधळण झाली.
ऊसाची लागवड संपली. समदे शेतमजूर, बायका गेल्या.
नदीकाठच्या विहीरीवरच्या पाण्याच्या टाकीवर हातपाय धुवायला मोहना वाकली तर मागनं पावलं वाजली.
सावधपणे मोहना उभारली. तीने नागाचा फणा काढल्यागत धुंद नजरेचा चंदरराव पाहिला.
"माझ्यापासून किती जपशील? स्त्री जन्म तुझा."
"स्त्री जन्म काय तुम्हाला एवढा दुबळा वाटला." मोहनानं कंबरेला असलेला धारदार विळाच काढला. ती निर्भान झाली. त्याच्यावर विळा घेऊनच धावली. त्याच्या मुंढीलाच तिनं धारदार विळा घातला. मुंढी वाचवण्यासाठी तो मागं होत धडपडला न तोल जाऊन विहीरीच्या कठड्यावरून आत कोसळला.
भलं मोठ वडाचं झाड जाळून कोळ करणा-या विजेगत मोहनाचा चेहरा उजळून निघाला.
स्त्री जन्म दुबळा न समजणा-या मोहनाची कहाणी.

068 शरीर 2009 अजब पब्लिकेशन, कोल्हापुर 215
प्रसिध्दी 2009, अजब पब्लिकेशन्स, कोल्हापूर.

मदिरा आणि मदिराक्षी "सैली" त धुंद होऊनही भन्नाट लेखन करणा-या लेखक श्रीकांत सीनकरला अर्पण केलेली एक भन्नाट कहाणी.

स्त्री शरीर, पुरूष शरीर .. सर्वांचीच शरीरं ... नैसर्गिक रूप घेऊन येतात. पण त्यातील वृत्ती वेगवेगळ्या. काही स्त्री पुरूष सुखाचा संसार करतात. तर बाकी .. ह्या वृत्तींचीच कथा.

069 निवडणूक 2009 अर्पिता प्रकाशन, पुणे. 240
एक लेखक आणि एक राजकारणात यशस्वी होऊन कासदार झालेला, दिल्लीच्या यमुनेच पाणी पिऊन बदललेल्या राजकिय आखाड्यात मुरलेल्या मित्रांची ही कहाणी. समाजमुल्ये कसकशी बदलत जातात त्याचा वेध घेणारी कादंबरी.
070 लोकनेता 2009 अजब पब्लिकेशन, कोल्हापुर 368
कादंबरी- निवडणूक - प्रसिध्दी २००९: अर्पिता प्रकाशन, पुणे.

होय, लोकसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी घेतली मी घोडे बाजारातली माझी किमत आणखी काही ऐकायचंय... लोकसभेची पुढची निवडणूक येईपर्यंत पोत्यानं पैसा कमवायला हवा.
खासदार हर्षवर्धन, तू म्हणे गोव्यात एका किरीस्ताव बाईचा बंगला तिच्या जमिनीसकट घेतला, तिची हत्या की आत्महत्या, आवाज उठतोय. तुझं नाव घेतलं जातंय. अशी बातमी उद्या आली तर -
लेखक, तूच तुझ्या राजकिय कादंबरीत लिहीलसना... राजकारण म्हणजे बदमाशांचा अ·ा...
अरे, तू सत्तधारी पार्टीचा खासदार नाहीस. संघर्ष करणार्या जनसंघर्ष पार्टीचा तू एकमेव खासदार ... माझा मित्र म्हणून मी तुला-
लेखका, तुला काय म्हणायचंय, ते तुझ्या पुस्तकात लिही...
खासदार, तुझ्यासारख्या बदमाश मित्रापासून जपायला हवं, दुसरं काय.

071 फितूर 2009 अर्पिता प्रकाशन, पुणे. 240
आमदार खासदार पाच वर्साच्या अवधीत पार मालामाल होतात. गाव पतपेढी, तालुका बॅंक, जिल्हा बॅंक, राज्य सहकारी बॅंक समदीक तो हात फिरवतो. संचालक, चेअरमन होतो. नोटांची बंडलं खिशात भरतो. त्याला मान सन्मान मिळतो. दरोडेखोरच तो. पण  पोटासाठी पतपेढ्या, बॅंकेवर दरोडाटाकून पोट भरणार्यांना तुरुंगात खडी फोडाव्या लागणार्या दरोडेकोरांच्या जिंदगीचं काय? दरोडकोरांची भयाण वास्तव रंगवणारी अस्सल ग्रामीण फितूर कादंबरी.
072 मॅडम 1998 एस. के. पब्लिकेशन, पुणे. 158
इंजिनिअर असलेला एक कवी. त्याच्याच साहेबाच्या मॅडम मध्ये कसा रंगत जातो, ती त्याला कशी खेळवते ती रचगतदार कहाणी.
073 संन्याशी - मेघना प्रकाशन, पुणे. -
संसार उधळल्याने संन्यासी झालेल्या जिवाची अघोरी कथा.
074 मायलेकी 2002 पार्टनर पब्लिकेशन, विरार, ठाणे. 215
साध्या भोळ्या मायलेकी. अशा सामान्य जिवांना जगात किंमत ती काय? अशा स्वभावाची माणसं अशीच कुत्र्यागत जगतात, मरतात. त्यांना ना इच्छा, आकांक्षा. त्यांना सावरण्याचा प्रयान करुनही हाती मातीच. कथा नायकाच्या आई बहिणीची म्हणजेच मायलेकीची ही दु:खमय कथा.
075 सख्खे भाऊ - - -
चार भाऊ. प्रमानं रहाणारे पण वाटपाचा प्रश्न आल्यावर सख्खे भऊ कसे वैरी होतात, ते पहा ह्याकहाणीत.
076   व्याकुळ - बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 214
077   बंधमुक्ता - बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. -
078   रांगडा - बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. -
079   भुजंगा - बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. -

Top