द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Published Books - प्रकाशित पुस्तके

 लेखक - द. स. काकडे, कादंबरी
कादंबरी क्रमांक 001 ते 0
20
कादंबरी क्र. (001 ते 020) - (021 ते 040) - (041 ते 060) - (061 ते 079) - पुढचे पान

अनु. क्र.

मुखप्रुष्ठ

पुस्तकाचे नाव प्रकाशन वर्ष प्रकाशक प्रुष्ठ संख्या

001

कामभूल 1976 प्रिया प्रकाशन, मुंबई. 164
प्रसिध्दी 1974, प्रिया प्रकाशन, मुंबई. - दुसरी आवृत्ती 2006 अमोल पब्लिकेशन, पुणे.

दोनशेपेक्षा जास्त कादंब-या लिहीणा-या लेखकाची ही पहिली भाषा वैभवानं नटलेली कादंबरी. संस्कृत वाङमयाचे थोर जाणकार लेखक आनंद साधलेही ह्या कादंबरीवर लुब्ध झाले. त्यांनी द.स.काकडे यांची 1974 साली पाठ थोपटली. म्हणाले, "संस्कृत वाङमयाचा अभ्यास असणारा लेखकच अशी शृंगारिक कादंबरी लिहू शकतो."

कामभुलीत सापडलेल्या यौवनानं मुसमुसलेल्या वैशाख खेड्याच्या पाटलाच्या वेणूची ही धुंदफुंद कथा. वाचकांना सारं काही विसरायला लावील.

002 सारा जन्म उन्हात 1977 अभिनव प्रकाशन, मुंबई. 148
१) सारा जन्म उन्हात - प्रसिध्दी १९७७:  प्रकाशक वा. वि. भट

अत्यंत गाजलेली लेखकाची पहिली कादंबरी - स्त्री स्वातंत्र्याचा आपण तोंडाने कितीही उदो उदो करीत असलो तरी तो फसवा आहे. खेडेगावातील स्त्रीजीवन अजून असहाय्य आहे. आज खर्या अर्थाने दलित आहे ती खेड्यातील स्त्री. तिच्या दु:खाला वाचा फोडणारी ही कादंबरी.

कामभूल
 

२) आलोचना - समीक्षाप्रधान मासिक - ऑक्टोबर, १९७९

बबी या स्त्रीच्या भावविश्वात घडत गेलेल्या घटना या कादंबरीत तपशिलवार आलेल्या आहेत. जन्मल्याबरोबर जिचा बाप मेला आणि तिच्या आईला घरच्या लोकांनी घराबाहेर काढले. बबीच्या आयुष्यातील अनेक चढउतार या कादंबरीतून स्पष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न लेखकाने केला आहे. ह्या कादंबरीतील जमेची बाजू म्हणजे व्यक्तिरेखांचा जिवंतपणा. व्यक्तींच्या हालचालींचे सूक्ष्म चित्रण अत्यंत बहारदारीचे. पतंगराव क्रूर आहे, हिंस्त्र आहे. जनावरांच्या बाजारातला तो डॅडी. जनावरांपेक्षा जास्त किंमत तो माणसांना देत नाही. बापाने पुरून ठेवलेल्या धनाच्या हंड्याला तो बाहेर काढतो तर आत नागराज व त्याची पिलावळ. धनासाठी तो सर्पयज्ञच करतो. द.स.काकडे हे नाव गेल्या दशकापासून मराठी कादंबरीला आणि वाचकाला परिचित होत गेले आहे. त्यांच्या लिखाणाला एक निश्चित असा ठामपणा आहे. त्यांच्या कथानकातील पात्रे विशिष्ट असली तरी टाईप होत नाहीत. काकड्यांकडे संवेदनशक्ती आहे. पात्रांचा आवश्यक तेवढा परिचय आहे. पात्र सजीव करण्याची त्यांची लेखनशक्ती अफलातून आहे.

३) लोकप्रभा: साप्ताहिक १०फेब्रूवारी,१९८०

द.स.काकडे यांनी सारा जन्म उन्हात या कादंबरीत साचेबंद ग्रामीणरंग न वापरता खेड्यातील गावरान रांगडेपणा, आपापसातील भांडणे, स्त्रीसुलभपणा यांचे रम्य दर्शन घडविण्याचा प्रस्तुत कादंबरीत प्रयत्न केलेला आहे. कादंबरीत वडाराची सोनी, चंदर, बबी, तिची आई, आनंदी, पतंग्या या सार्यांचे जीवन परिस्थितीच्या उन्हामुळे होरपळून निघालेले आहे. कादंबरीत व्यक्त झालेला संघर्ष इतका तीव्र आहे की त्यामुळे वाचक कथानकात चक्रावून जातो. कादंबरीचे कथानक एवढे प्रभावी की तो कादंबरीत हरवून जातो.

४) नवाकाळ - २८ जुलै,१९८०

एका निरपराध अजाण जीवाला परिस्थितीच्या तीव्र उन्हाÈयात कसे होरपळावे लागले, त्याची मनोवेधक कथा द.स.काकडे यांनी सारा जन्म उन्हात या कादंबरीत रेखाटलेली आहे.

003 रात्र अर्धी... चंद्र अर्धा 1979 प्रिया प्रकाशन, मुंबई. 144
१) कादंबरी रात्र अर्धी...चंद्र अर्धा - प्रसिध्दी - १९८० : प्रिया प्रकाशन, मुंबई

नंदिनी, तू स्त्री...मी पुरूष
पण आपण दोघेही आहोत फक्त स्त्री-पुरूष देहाच्या सावल्या

अरविंद बाबू, एका दु:खी माणसासारखे जगात दु:खी कुणीच नसते. नंदिनीनं अरविंद बाबूंकडं अनिमिष नेत्रांनी पाहिलं.
नंदिनीनं हनुवटीवर करंगळी टेकवली. अरविंद बाबूंकडं आणि स्वत:कडं पहात ती बोलली-

रात्र अर्धी...चंद्र अर्धा...मी अपूर्ण स्त्री तर तुम्ही अपूर्ण पुरूष... आणि त्यावर दोघे कितीतरी वेळ हसत राहिले.
एकमेकांच्या गÈयात हात घालून ते बंगली बाहेर आले. त्याचवेळी घड्याळात अर्ध्या रात्रीचा टोल पडत होता.
अर्ध वर्तुळाकार असलेला चंद्र अर्ध्या रात्रीशी भिडत होता.

004 राणी 1980 प्रिया प्रकाशन, मुंबई. 255
प्रसिध्दी 1980 प्रिया प्रकाशन, पुणे.

"राणीऽऽ, कशी आहे ही जवानीची हवा?"
"छाऽऽनऽ"
"शेखर नवरा म्हणून कसा वाटला?"
"शी,,! घाणेरडा मेला! रानटी जनावर! त्याला माणसातला शृंगार कळत नाही."
"म्हणजे तो तुला कधी आवडलाच नाही?"
"त्यापेक्षा मला डॉक्टर गोपाळ आवडला .. त्यानेच मला खरा शृंगार शिकवला .."
"अग, शेखर तुझा नवरा .. तर डॉक्टर गोपाळ परपुरूष .."

संसार मांडुनही परपुरूषाच्या सुखाला चटावलेल्या आणि त्याची घोर शिक्षा भोगाव्या लागलेल्या तरूण विवाहितेची दारूण कथा.

005 पंचफुला 1982 प्रिया प्रकाशन, मुंबई. 316
मुगुटराव इनामदार, विवाहीत जमीनदार. लग्नापुर्वी प्रेम करणार्या बाईसाब आणि लग्नानंतर जिच्यावर प्रेम करावसं वाटतं, ती पंचफुला. पंचफुलावर आणखी एक प्रेम करणारा वेडा पीर म्हणजे भुजंगराव. आणि ह्या दोघांनाही टाळून पंचफुला जयसिंगराववर प्रेम करते. कुकडी नदी, तीन वतनदार आणि पंचफुला प्रेमसंघर्ष कसा खुलवते, त्याची ही जबर्दस्त कहाणी.
006 चांदणी 1983 गुलमोहर प्रकाशन, सातारा. 297
कादंबरी - चांदणी - प्रसिध्दी १९८३: गुलमोहर प्रकाशन, कोल्हापूर. दुसरी आवृत्ती २०१६: शांती पब्लिकेशन्स, पुणे.

आकाशात चंद्र वर आला होता. समोर पसरलेला तो समुद्र आणि त्याच्या त्या काठावर उभे असलेले ते प्रेमी जीव. समुद्राला उधाण येत होतं. त्यांच्यातील भावनांनाही उधाण आलं होतं. चांदणीनं आकाशात पाहिलं. एक तेजस्वी चांदणी चंद्राकडे सरकत होती. ते अॅस्टिन रिबेरानं पाहिलं. अनावर होऊन त्यानंही चांदणी भोवताली आपले हात गुंफले. चांदणीच्या ओठावर कधी नव्हे ते गाणं आलं. तू मेरा चांद, मै तेरी चांदणी. दु:खी चांदणीच्या जीवनात चांदणं पसरविणार्या तरूणाची सुखद कहाणी.
 

007 चंन्द्रमुखी 1983 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 220
प्रसिध्दी 1983 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

क्रांतीकारकांसाठी संपत्ती उभा करणारा दरोडेखोर बेरड सावळा आणि फिरंगी तरूणी ह्यांच्या प्रेमाचं फळ म्हणजे चंद्रमुखी.
गरोदर जेनीला सोबत घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या सावळ्या मागं मार्शल आपली फौज घेऊन दौड करतो. जेनीचे दिवस भरल्यानं सावळा आडरानाचा आसरा घेतो. जेनीला मुलगी होते. तिचा टेहाचा आवाज ऐकून गोळी सणसणत येते. जेनीच्या छातीत घुसते. जेनी जगणार नाही हे ओळखून सावळा प्रेमभराने तिला थोपटतो. जेनी हात हलवते, निरोप देते. मरताना म्हणते, "तुझ्या माझ्या प्रेमाला नीट सांभाळ."

सावळा कोवळ्या मुलीला कपड्यात गुंडाळून सावधगीरीनं घोड्यावरनं रस्त्यावर येतो तर तमाशाच्या बैलगाड्या. सावळा त्या बैलगाड्या ओळखतो "गुलाबेऽ" तो आवाज घालतो.

क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रासाठी दरोडे घालून पैसा उभा करणा-या दरोडेखोर सावळाचा आवाज ऐकून गुलाबबाई गाड्या थांबवते. सावळा पुढे ती धावत येते. त्याच्या हातातली कोवळी पोर पाहून ती ओळखते, बोलते.
"सावळादादा, तुझ्या पराक्रमावर जीव टाकणा-या जेनीची ही लेक ना?"
"नुसती जेनीची लेक नाहय .. माझी पण लेक आहे."
"जेनी कुठाय?"
"गोळी लागून पडलीय .. जीव सुटला असेल तिचा."
"चाल ..आपण जाऊ तिच्याकडं"
"तू ही लेक सांभाळायची ... जेनीकडं मी जातो. तिला मुठमाती देतो. जगलो वाचलो तर पुढच्या मुक्कामात भेटतो मी .."
जेनी आणि सावळाची देखणी लेक चद्रमुखीची रोमांचकारी कथा.

008 ठिणगी 1984 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 244
प्रसिध्दी 1984 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

जंगलात वाळलेल्या झाडांच्या फाद्या एकमेकांवर घर्षण करीत राहिल्या की त्यांच्या घर्षणानं ठिणगी खालच्या वाळल्या गवताचर पडते न गवत पेटलं जातं. त्यातूनच मग जंगलात आग लागते. ती आग साधी राहात नाही. त्यात ओले सुके सारेच पेटून उठते. माणसाचं पण तेच ते सुडाने पेटले की त्यांच्यातून संघर्षाच्या ठिणग्या उडतात. त्यात सारेच मग जळून खाक होते. दुष्मनगिरीचीच ही ठिणगी ...

009 छबिना 1985 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 303
कादंबरी - छबिना - प्रसिध्दी १९८५: बांदोडकर पब्लिकेशन हाऊस, गोवा. दुसरी आवृत्ती २०१३: शांती पब्लिकेशन्स, पुणे.

छबिना म्हणजे देवीच्या पालखीची मिरवणूक. देवीची काठी मिरवणुकीत नाचवली जाते. ढोल, लेझीम, टिपर्या, बँडच्या तालावरचा बेभानपणे नाचली जाणारी तरूण पिढी. अंगात देवीचा संचार झाल्याने लिंबाचा झाडोरा हातात घेऊन पालखीपुढं नाचणारे स्त्री पुरूष. पुरूषांपेक्षा बायकांची जास्त संख्या. छबिन्यालाच जोडून दुसर्या दिवशी होणार्या पैलवानांच्या तांबड्या मातीतल्या कुस्त्या. कुस्तीच्या आखाड्यासाठी आलेला पैलवान आनंदराव आणि गावातील तारूण्यात बहरलेली सुंगता ह्या दोघांची छबिन्यात गाठ पडते. सुगंताच्या मुठीतला गुलाल आनंदरावावर चुकून उधळला जातो. मग होणारी त्यांची अचानक भेट. ह्या भेटीचे वर्णनही धुंदफुंद शब्दातलं. आनंदराव, हे शरीर अजून तसच हाय. त्याला कोन्हाची नजर लागू धिली न्हायं. म्या हा असा दांडगा पैलवान. मला तुPयासारखीच दाणगट तरणी पोर पाह्यजी व्हती. बा ला ती मिळत नव्हती. मग बाला म्याच म्हणलं, मला मिळाली तर पाह्यतो... तर तूच मिळालीस-. म्हजी छबिन्यात म्या गुलाल उधळला ते बेस केलं - कादंबरी वाचायला घेतली की खाली ठेवता येत नाही, हे तिचं यश.

010 कल्याणी 1985 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 221
कादंबरी - कल्याणी - प्रसिध्दी १९८५: बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

कल्याणच्या गुलमहालची कोठावाली नूरजान ही तरूण मुलींना पळवून धंद्याला लावणारी बाजारबसवी.
गुलमहालवर पोलीस धाड पडली. त्या कुंटणखान्यात दहाबारा मुलींची सुटका करण्यात आली. त्यातलीच एक देखणी कल्याणी. फौजदार सहाणेंनी कल्याणीला आपल्या जीपमध्ये बसवून नारायणगाव पोलीस ठाण्यात आणलं तर तेथे पोलीस कोठडीत कोठीवाली नूरजान. तिला पाहून कल्याणी ओरडलीच - नूरजान. देखण्या कल्याणीची मनाला सुन्न करणारी कहाणी.

011 प्रेम बंधन 1985 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 228
प्रसिध्दी 1985 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

मृदुलाच्या मानाविरूध्द लग्न ठरलं. तिला ते नको होतं. आत्महत्येसाठी ती आगगाडीकडं धावली. ती मेली नाही. तिचे गुडघ्यापर्यंतचे पाय तुटले. आनंदला ती बातमी कळली. तिच्या पायाच्या जखमा भरल्या. पण ती उभी राहू शकणार नव्हती. व्हिलचेअरवर जिंदगीभर ती हालचाल करू शकणार होती. तरीही आनंद तिच्याशी लग्न करायला तयार होता.
"मृदुला, तू काय करून बसलीस हे? " आनंद बोलला.

"आनंद, तू माझ्या प्रेमाची गोष्ट सोड .. आपण लग्न न करणं उत्तम. आपण फक्त प्रेम बंधनात रहाणं उत्तम. लग्न झाल्यावर दिवस जाणे हे मी सहनच करू शकणार नाही. किती प्रॉब्लेम होणार आहेत माझे, तुझे, सर्वांचेच. तेव्हा नो मॅरेज ... नो प्रॉब्लेम्स ..."

टीपॉयवरच्या लाल गुलाबाची फुल घेऊन आनंद सटक्यात उठला. भरल्या डोळ्यांनं त्यानं मृदुलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातील अश्रु गालाचे गुलाब भिजवत होते ... प्रेमबंधनाची कादंबरी

012 चंदन 1985 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 245
प्रसिध्दी 1985, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

नागसर्पाऽ, थांब.. चंदन जिवाच्या आकांतानं ओरडला.
नागसर्पानं दांडग्या शरीराचा चंदन पाहिला. त्यानं दहा आकडा दाखवलेली फडा जमिनीवर आपटली न तसाच तो सळसळत दगडाच्या खिरपाळात गेला. चंदनने खिरपाळात उडी घेतली. खिरपाळातनं धावताना चंदनच्या अनवाणी पायाला खिरपाळाचे फटके बसले. दोन्ही पायांचे आंगठे फुटले. भळभळा रक्त सुटलं. तरी तो नागसर्पामागं सुसाटला. ओढ्याच्या पात्रात चंदनने त्याला गाठला. हातातली काठी त्यानं उभारली. भाला फेकावा तशी ती त्यानं नागसर्पावर फेकली. तशी आर्त किंकाळी उठली.

चंदननं तो आवाज ऐकला न तो तिकडं धावला. सुचित्रा डोकं धरून कोलमडून पडली होती. चंदनचं ऊरच फाटलं. त्यानं सुचित्राच्या डोक्याची खोक पाहिली. रक्त उसळी घेत होतं. सुचित्राचा चेहरा भरून गेला होता... आपल्या हाती काठी ऐवजी भाला असता तर...

"सुचित्रा, काय घडलं हे?"
"तुझी न सर्पाची झुंज पाहात होते, तर तू माझ्या डोक्याचा निशाणा साधलास.."
चंदननं ओढ्याच्या काठच्या धावमारीचा पाला उपटला. खडकावर ठेवून त्यानं गोलं दगडानं बारीक मिरचीगत वाटला. त्याचा लेप त्यानं सुचित्राच्या डोक्यावरच्या जखमेत थापला. आपल्या कंबरेचं फडकं काढून ते त्यानं तिच्या डोक्याला बांधलं..
"चंदन, मला वाटतं दोन टाके तरी पडतील जखमेला"
"टाक्याची गरज नाही."
"धनुर्वाताचं इंजेक्शन घ्यावं लागेल."
"गरज नाह्य. बापजाद्यांनी निसर्गात एवढी औषध ठेवलीत.. पण वापरतो कोण? जो तो पळतोय शहरातल्या डाक्टराकं काय कळतेय त्या सुक्काळीच्यांना.."
"चंदन.."
"काय?"
"तो तुझ्या हातनं सुटलेला नागसर्प बघ कसा शेपटीवर उभा राहून आपल्या दोघांकडे पाहातोय.."

रक्ताळलेल्या पावलांनी चंदन नागसर्पाच्या रोखानं धावला. नागसर्पानं फणा खाली आपटला. धूळ उडाली. सळसळत तो वारूळात पळाला. किल्ल्यात लपलेल्या राजागत तो आरामात पडणार होता. पण त्याचं बाहेर राहिलेलं वीतभर शेपूट चंदननं चपळाईनं पकडलं. निर्भान होऊन मग तो त्याला वारूळाबाहेर खेचू लादला......

नागसर्पाशी खेळ खेळणा-या चंदनची ही श्वास रोखणारी कहाणी.

013 नवे पाणी 1985 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 301
कादंबरी - नवे पाणी - प्रसिध्दी - १९८५: बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

जुन्या नव्याचा संघर्ष हा वर्षानुवर्षे चालला आहे. आज जे नवं असेल तेच उद्या जुनं असतं. मग पुन्हा नव्याचा जन्म, पुन्हा नव्या जुन्याचा संघर्ष. प्रत्येक पिढीबरोबर नवं नवं जन्म घेत असतं. नव्या जुन्यानं जमवून घ्यायला हवं. जुन्या नव्याचा संघर्ष रंगवणारी ही कादंबरी.

014 वावधन 1986 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 206
अंधश्रध्दा सामाजाला वाईटच. निर्बुध्द, अडाणी लोक त्यात गुरफटतात. साधुसंन्याशांच्या लबाडपणाच्या ढोंगात फसतात. अशी एक सुसाट कथा.
015 नागीण 1986 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 214
नाग्गी नावाची येध्या दरोडेकरांची लाडकी नागीण. दरोडा नसताना येध्याच एकच काम. नाणे घाट, माळशेज घाट, भिमाशंकरच्या जंगलपट्टीत नागीण पकडायची. हातात नागसर घेऊन तो वाजवायचा. नागिणीला खेळवायची. अशा या दरोडेखोराच्या जिंदगीत एक मानवी नागीण येते तिची ही कथा.
016 तमाशा 1986 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 226

भुजाराव पाटलाला पोर होत नव्हतं म्हणून त्यानं खंडेरायाला नवस केला. पोरगा व्हवदे पोरगी. तुला ती सोडीन. त्याला पहिलीच पोर झाली. चांगली धा वर्षाची पोर झाली. पण भुजाराव नवस फेडीना. पोरीला खंडोबाची मुरळी करीना. उलट तिला सोयरीक बघू लागला. पोरीचं लगीन जमलं. साखरपुडा झाला. पोरीला ताप भरला, तिस-याच दिवशी ती मेली. खंडोबाचाच कोप.
भुजाराव पाटलानं स्वत:च्या थोबाडात मारल. देवाला बोलला, देवा आता पुन्हा नवस करतो. पोरगी झाली तर तुला मुसळी म्हणून सोडतो. पुन्हा मुलगी झाली. काळजावर दगड ठेवून भुजाराव पाटलानं त्या पोरीला देवाला सोडायचा निर्णय घेतला. पोरीचं नाव बानू ठेवलं. देवाच्या दुस-या बायकोचं ते नाव.

बानू मोठी झाल्याल तिला जेजुरी गडावर नेण्यात आलं. देवा वाघ्यानं पताका लावलेला झेंडा उभारला. नवरानवरीगत झेंडा न बानू यांच्यामधी धोतर धरलं. मंगलाष्टकं झाली. लगीन लागले. पण बानू झेड्याला म्हणजे देवाला माळ घालीना. तिला मुरली व्हयचं नव्हतं. लगीन देवाशी पण जलमभर नवरे दुसरेच. ते तिला मान्य नव्हते. अशा बानूचीही काळजाला पीळ पाडणारी कथा.

017 मोहर 1986 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 228
प्रसिध्दी 1986, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

"बंधो प्रभुराज, मी आजपर्यंत घर सांभाळलं. तू तीर्थयात्रा करीत राहिलास. आता तीर्थयात्रांना जाण्याचा माझा विचार."
"तुम्ही लगेच जाणार?"
"नाही, माझी काही कर्तकर्मे आहेत ती पूर्ण झाली की जाणार."
"बंधो, तुम्ही तीर्थ यात्रांना अवश्य जा. पुन्हा या. कारण शेवटी घर हेच देवाचं घर असतं. त्यातच आपणाला देव प्राप्त होत असतो. घरातच नैमित्तिक क्रीयाकर्मे पार पाडावीत. त्या पवित्र परमेशाचं नाव घेत जीवन जगावं हे खरं."
ते आमराईकडं आले. आमराईतला मोहर आता गळणार नव्हता. झडणार नव्हता. त्याला गोड रसाळ फळे लागणार होती.
एक रसाळ कथा. मन प्रसन्नचित्त करणारी. परमेशाचं दर्शन घडविणारी.

018 नदीपार 1987 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 212
प्रसिध्दी 1987 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

देऊन विहिरीत जीव दिला. काशीनाथ, जानू धावत आले. सारा गाव जमा झाला. विहिरीच्या पाण्यात गळ टाकण्यात आला. पहिल्याच गळाला देऊचा मुडदा वर आला. विहिरीच्या चाकावरून दोर खाली गेला. खाली उतरलेल्या माणसानं तिच्या कंबरेला फासा मारला. दोर चाकावरनं वर ओढण्यात आला. देऊचा मृत देह विहिरीच्या थारोळ्यात घेण्यात आला.
गावात पोलीस होता. त्यानं पिंपळवाडी पोलीस ठाण्यात बातमी दिली. मग सारं पोलीस ठाणं आलं. जाबजबाब झाले. देऊच्या गळ्यात मंगळसुत्र नव्हतं. नको असलेल्या नव-याचं तिनं बंधन तोडलं होतं. तिच्या ब्लाउजनध्ये चिठ्ठी मिळाली. तिनं लिहीलं होतं ... माझ्या मनाविरूध्द हे लग्न झालं. मला राजानं महिपतरावाला पंचवीस हजाराला विकली. त्यानं बळजोरीनं माझ्याशी लग्न केलं.. महिपतरावांनी पहिली बायको विहिरीत बुडवून मारली. का? तर तिचं लग्नाआधीचं प्रेम उघडकीस आलं .. माझही प्रेम काशीनाथवर आहे, हे जर उघडकीस आलं तर तो मला सुध्दा विहिरीत बुडवून मारल्याशिवाय राहाणार नाही. असल्या बदनाम नव-याशी कसा संसार करणार? म्हणून मी गळ्यातलं मंगळसुत्र तोडलं. विहिरीत उडी घेतली .. काशीनाथशी लग्न झालं असतं तर आनंदानं संसार केला असता ...
"काशीनाथ, तुझी देऊ तुझ्यासाठी मेली नाही बघ .. ती जिती समजायची. जानू दोस्त."
"हा, माझी देऊ मेली कुठाय? ती तर मला चांदण्यात नदीपार होऊन भेटाय आली होती रात्री ... काशीनाथ बोलला."
काशीनाथ बोलला. त्याच्या डोळ्यात घळाघळा अश्रूं आले.

019 कातळ 1987 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 240
प्रसिध्दी 1987 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.

उगवतीला दिसाचा गोंडा वर आला. नदी तिरावरची जंगलपट्टी पाखरांच्या चिवचिवाटानं भरून गेली. जंगलपट्टी तुडवतच नदी तिरावरच्या कातळावर व्यंकट आलं. तेथेच त्याला कांता भेटलेली. दोघांच्या भेटीला तो कातळच मोठा साक्षीदार होता. व्यंकटनं डोळा भरून कातळ पाहिला.
"कांताऽ" व्यंकटनं तिला पाहाताच हाक घातली.
कांता जवळ आली. ती गर्भवती होती. तिच्या चेह-यावर तेज होते. नवा बालसूर्य तिच्या पोटी जन्म घेणार होता.
"तू दरोडेखो-याच्या नाईक कारभा-याला सोडलंस न मला कातळावर मागं भेटली होतीस"
"कारभा-या म्हातारा .. मला तो नको होता. त्यानेच तुझा पराक्रम सांगीतला. ठरवलं राह्यचं ते तुझ्याजवळ. जवान मर्द तू .. आता बाप होणारेस माझ्या पोराचा.."
"म्हणून तर मी दुस-या दरोडखोराची टोळी पकडली."
"व्यंकट, भीमासारखा बलदंड पुरूष सोबतीला असल्यास मला डर नाही कोणा दरोडखोराची. समजलं?"
"हो .. घाबरू नकोस. तुझ्या राखणासाठी माझ्याजवळ बंदुक, फरशी, कु-हाड समदी हत्यार हायेत."
"मी बी वाघीण हाये .. सामनी येईल त्याला फाडून खाईन .."
कातळाकडं बेगुमानपणं पाहात व्यंकटनं खांद्यावर हात टाकला. खांद्यावर हत्यार टाकून तो सामनीच्या गुहेकडं निघाला.

020 दुरावा 1987 बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. 207
प्रसिध्दी 1987, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा

"नाटककार, तुमच्या नाटकाच्या वहीच्या पानांची चाळण झालेली दिसतेय."
"होय, अनेकांनी माझ्या ह्या नाटकाची पानंन पानं चाळून पाहिली, वाचली. काहींची मनं पेटली. काहींची मनं धगधगली. त्यामुळेच कोणी ह्या नाटकाला हात लावण्याचं धाडस केलं. ह्या नाटकाला कोणा निर्मात्यानं उभं केलं असतं तर ह्याच्या नाट्य प्रयोगानं मराठी रंगभूमीवर इतिहास निर्माण झाला असता."
गोविंद कोकीळ ह्या नाटककाराची आणि कालिंदी ह्या नटीच्या जवळकीची आणि दुराव्याची नाट्यमय कथा ह्या कादंबरीत चित्रमय शैलीत सादर केलेली आहे.

Top