द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Facilities and Infrastructure

Contact Us - संपर्क

 द. स. काकडे
     बी-407, सिद्धेश्र्वर,
     शिवाजी पार्क,
     दादर, मुंबई - 400 016

 मोबाईल: 9619888113

 इपत्र: deepakakade71@yahoo.com

  द.स.काकडे कथासंग्रह - परिक्षणे
द. स. काकडे यांच्या मुर्हाUी कथासंग्रहावरील काही परिक्षणे-
१) मराठा-रविवार पुरवणी-२७डिसेंबर,१९७०:संपादक-आचार्य अत्रे
मुर्हाUी - हा द.स.काकडे यांचा रगेल अशा ग्रामीण कथांचा पहिला वहिला संग्रह. या कथासंग्रहातील ग्रामीण शब्दांचा समावेश कोणत्याही
छापील शब्दसंग्रहात आढUणार नाही. एखादा शब्द सापडलाच तर त्या शब्दाची काकडे यांना हवी असलेली छटा तो शब्दकोश सांगू
शकणार नाही. द.स.काकडे ह्या समर्थ कथाकाराने लिहिलेली ही रगेल कथा मराठी कथावाङमयात आपले वेगUे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान
निर्माण करून राहिलेली आहे.
२) माणूस - साप्ताहिक १४आ@क्टोबर,१९७०: समीक्षक सौ.पुष्पा भावे
द.स.काकडे यांचा मुर्हाUी कथासंग्रह प्रादेशिक वातावरणाच्या कक्षेतील असूनही तो साचेबंद ग्रामीण कथेसारखा निर्जीव झालेला नाही.
कारण त्यांना स्वत:ची स्वतंत्र अशी कथाशैली लाभलेली आहे. हा कथासंग्रह वाचत असताना लेखकाच्या पुढील कथालेखनाविषयी ग्रामीण
अथवा प्रादेशिक संदर्भनिरपेक्ष कथा म्हणून अपेक्षाही निर्माण झाल्या आहेत.
३) शिवनेर- २३आ@क्टोबर,१९७०: संपादक-विश्वनाथराव वाबUे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बी.ए.आ@नर्स झालेले सत्तावीस वर्षाचे दत्तात्रय सदाशिव काकडे यांनी लिहीलेल्या ग्रामीण स्त्रीच्या
आभाUभर दु:खाचा १४कथांचा मुर्हाUी हा कथासंग्रह. लेखक जुन्नरचे असल्याने थेट जुन्नरी भाषेत गोष्टी लिहीलेल्या आहेत. मराठी
शारदेच्या मंदिरात काकडेंची कथा गुण्यागोविंदाने नांदेल आणि सदाशिव काकड्यांच्या पोराचा साहित्यप्रांत सुखाचा करील हीच आमची सदैव
सदिच्छा!
४) महाराष्ट्र टाईम्स रविवार आवृत्ती २४जानेवारी,१९७१:
द.स.काकडे ह्या नवोदीत कथाकाराला मुर्हाUी हा कथासंग्रह चांगल्या ग्रामीण कथाकारांच्या रांगेत सहजपणे स्थान मिUवून देण्याइतपत
सरस उतरलेला आहे.
५) नवाकाU - २७डिसेंबर१९७०
द.स.काकडे यांचा मुर्हाUी ग्रामीण कथासंग्रह खूपच अपेक्षा उंचावणारा आहे. कथासंग्रहातील जीवन दर्शन प्रत्ययकारी आहे.
६) धनुर्धारी मासिक आ@क्टोबर,१९७०: वामन होवाU
ग्रामीण स्त्रियांची दु:खे अनेकांनी रेखाटली असतील - आहेतही, पण त्या छटांपेक्षा काकड्यांनी कथन केलेल्या स्त्री दु:खाच्या छटा काही
वेगÈयाच. द.स.काकडे ह्या तरूण ग्रामीण लेखकाचा श्वास ग्रामीण स्त्रिच्या दु:खात अडकल्याने ह्या कथा प्रत्ययकारी झालेल्या आहेत. हा
तरूण दमदार लेखक भावी काUात उल्लेखनीय यश प्राप्त करील ह्याची खात्री वाटते.
७) साहित्य सहकार मासिक - आ@क्टोबर,१९७०: वि.वा.हिरे
मुर्हाUी कथासंग्रहातील १४ कथा म्हणजे १४ रत्ने आहेत. प्रत्येक कथेचा वेगवेगUा पैलू पाहावयास मिUतो. गडात, भिल्डक, दन्हारली,
गाडग्याचं चाक, फिराडू कितीतरी अनोख्या शब्दांची उधUण दिसते. हे शब्द दुर्बोध वाटले तरी लेखकाचे शब्दांविषयीचे इमान व प्रेम स्पष्ट
करते. मायमराठीच्या दरबारातली मुर्हाUीची हजेरी दमदार झालेली आहे.
८) तरूण भारत - रविवार आवृत्ती १३सप्टेबर,१९७०
ग्रामीण स्त्रीचे आभाUभर दु:ख द.स.काकडेंनी मुर्हाUी कथासंग्रहात उत्कटतेने रेखाटले आहे. बाप नवरा यांच्या वादात भाजून निघालेली
राही (कथा - शेंदरी आंबा) सासर्याच्या हटवादीपणामुUे उर फुटेपर्यंत कष्टणारी सून (कथा - सासुरवाशीण) सासर माहेरची अब्रू
जपण्यासाठी मुकाटपणे विहीरीचा तU शोधणारी सगुणा (कथा - सुटका) असुरी अतृप्त भुकेला बUी पडलेली नवी नवरी (कथा -
डागवलेली कैरी) . .. सर्वच कथा काUीज पोखरून काढणार्या. स्त्री ग्रामीण जीवनाची ओUख करून घ्यायची ज्यांना इच्छा असेल त्यांनी
ह्या कथा जरूर वाचाव्यात.
९) आलोचना - समीक्षाप्रधान अंक - जून,१९७१
द.स.काकडे यांची कथा खरीखुरी ग्रामीण आहे. म्हणजेच तिच्यामध्ये ग्रामीण कथेचा गाभा असलेली अनुभवांची क्रियाप्रतिक्रियात्मक
साखUी आणि भाषासंदर्भादि बाह्य गोष्टी हे दोन्ही घटक आहेत. त्यांचा परस्पर मेU चांगला झालेला आहे. मुर्हाUीतील ग्रामीणत्व हे
प्रामुख्याने मुके दु:ख आणि दारिद्य्र यांच्या परस्पर विणीतून बांधले गेलेले आहे.
१०) मुर्हाUी - प्रस्तावना - ल.ग.जोग
द.स.काकडे यांच्या वाङमयीन दीर्घ प्रवासाची मुर्हाUी ही केवU पेरणी आहे. ते जसजसे नवनवे अनुभव घेतील तसतसे त्यांचे लेखन तरल
व विस्तारलेले होत जाईल असा माझा ठाम विश्वास आहे.
–––––––––––––-
कथासंग्रह - कुकडीकाठच्या कथा - प्रसिध्दी मार्च, १९९८
समीक्षक प्रा.डा@.भास्कर शेUके
वर्गहीन - वर्णहीन दलित शोषितांच्या आभाUभर दु:खास कथाकाराने हा कथासंग्रह अर्पण केलेला आहे. जुन्नर तालुक्यातील कुकडीकाठच्या
प्रदेशाची पार्श्वभूमी कथांना लाभली असली तरी अन्य प्रदेशातही अशा प्रकारचे जीवनानुभव येऊ शकतात म्हणून ह्या कथासंग्रहाला
प्रादेशिकतेच्या चौकटीत बसविण्यात अर्थ नाही. कुठल्याही चUवUीच्या झेंड्याखाली न येता द.स.काकडे हे कथाकार म्हणून तटस्थपणे
लेखन करीत असल्याचे दिसते. एकूण २० कथांचा संग्रह.
स्वातंत्र्योत्तर काUातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातील दैन्याचे चित्रण पंधरा आ@गस्टचा दिस ह्या पहिल्याच कथेत समर्थपणे रेखाटले
आहे. कथानिवेदन करणारा स्वातंत्र्यसैनिकाचा पोरगा कथेत आपल्या शाUेतील झेंडावंदन करताना म्हणतो - पाठीमागे फाटलेल्या च·ीतून
बाहेर पडलेल्या माPया गरीबीच्या झेंड्याला फडकावत कसातरी उभा होतो. एक पाणवठा कथेत शासनाच्या विकास योजनांचा बोजवारा कसा
उडाला याचे प्रातिनिधीक चित्रण आहे. रक्त कथेत जन्म देणार्या आईवडिलांपेक्षा धनिक - श्रीमंत अशा नव्या सग्यासोयरांना जवU करणारी
पिढी यांच्यातील संघर्ष अभिव्यक्त होतो. गटारी अमोशा सारख्या कथेतून गावातील चांडाU चौकडीचा बेरकीपणा द.स.काकडे चित्रित
करतात. तांबडी माती तून पैलवानाच्या रणदार तयारीचे चित्रण आहे. भोग वेगÈया वUणाची कथा आहे. हेडी रांगड्या भावाचं चित्रण करते.
मुके दु:ख कथा मुक्या तरूणासोबत विवाह झालेल्या तरूण स्त्रीची कथा काUजात कालवाकालव करते. हुंदका मध्ये आणीबाणीच्या काU
ातील कुटूंबनियोजनाचा बोजवारा कसा उडाला ह्याचे भेदक चित्रण करते. कुंकू कथा व्यसनाधिनता, बुवाबाजी आणि स्त्रीच्या पतीनिष्ठेचे
नव्हे तर तिच्या रौद्र रूपाचे चित्रण करते. सारांश - कुकडीकाठच्या कथा मुUातूनच वाचाव्यात एवढ्या त्या ताकतीच्या आहेत.

––––––––––
गोरी मेहुणी - कथासंग्रह प्रसिध्दी १९८२
मानवी भावभावनांचा वेध घेणारा हा कथासंग्रह वाचकांच्या चांगलाच पसंतीस पडला.
––––––––
श्रावणधार - प्रसिध्दी १९९९
श्रावणधारेतील ओल्याचिंब आठवणीतील पहिलीच कथा श्रावणधारा रसिक वाचकांना गायरानातल्या धुंद भुलभुलैयात गुंतून ठेवते. मनुष्य
काय, प्राणी काय - तारूण्याच्या कैफात कसे धुंद होतात, मृत्यूला सामोरे जातात ह्यांची सनसनाटी कथा. सर्वच कथा मनाला हलवून
टाकणार्या.
––––––––-
कथासंग्रह रातचांदणी - प्रसिध्दी डिसेंबर,१९९६
कथाकादंबरीकार जयंत दUवी यांच्या अनोख्या स्मृतींस हा कथासंग्रह लेखकाने अर्पण केलेला आहे. सर्वच कथा वेगवेगUा आनंद देणार्या.
––––––––-
डोह - प्रसिध्दी डिसेंबर,२००९
एकूण १७ कथांचा हा अपूर्व नजराणा. डोह ही कथा दो जिवांच्या ताटातूटीची. तिचे लग्न होते मनाविरूध्द. त्यामुUे झालेला दुरावा. हा
दुरावा नियतीने केलेला. ती पिंजर्यातील, तो पिंजर्याबाहेर. दोघांची नदी पाणवठा डोहावर भेट होते. दोघेही जवU असून दूर दूर.
सखाऽ, तू स्वतंत्र .. .. मी स्त्रीजन्मानं बांधलेली
म्हणजे, तू आता मी राह्यलेली नाहीस
तू समजून घे. मी आता.. ..
तरी पण.. ..
तू विसरायचं सखा, मला.
तो चालू लागतो. ती मरकी झालेली. तरीही ती त्याच्या समजुतीसाठी त्याच्यामागनं धावते. अडखUून खाली पडते. उठून उभी राहते.
कुकडीमाईच्या पाणवठ्याच्या डोहात मग ती दगड फेकते. डोहात तरंगाकार तरंग उमटतात. थोड्याच वेUात डोह शांत होऊ पहातो. दगड
काUजात घेऊन.
द.स.काकडे यांच्या डोह सारख्याच इतर कथाही अशाच भाव भावना हलवणार्या. घरंदाज, थोरला, सवाशीण, सोयरीक, शाण, मरण... शेवटची
कथा स्वामी. ही कथा साक्षात्काराचा प्रत्यय देणारी. साध्या सोप्या सरU शब्दात प्रभु रामचंद्रांचं दर्शन देणारी. प्रत्येक कथा वाचावी अशी.
––––––-
द.स.काकडे काही कादंबर्या / अंतरंग / परिक्षणे
परिक्षणे
१) सारा जन्म उन्हात - प्रसिध्दी १९७७: प्रकाशक वा.वि.भट
अत्यंत गाजलेली लेखकाची पहिली कादंबरी - स्त्री स्वातंत्र्याचा आपण तोंडाने कितीही उदो उदो करीत असलो तरी तो फसवा आहे.
खेडेगावातील स्त्रीजीवन अजून असहाय्य आहे. आज खर्या अर्थाने दलित आहे ती खेड्यातील स्त्री. तिच्या दु:खाला वाचा फोडणारी ही
कादंबरी.
२) आलोचना - समीक्षाप्रधान मासिक - आ@क्टोबर,१९७९
बबी या स्त्रीच्या भावविश्वात घडत गेलेल्या घटना या कादंबरीत तपशिलवार आलेल्या आहेत. जन्मल्याबरोबर जिचा बाप मेला आणि
तिच्या आईला घरच्या लोकांनी घराबाहेर काढले. बबीच्या आयुष्यातील अनेक चढउतार या कादंबरीतून स्पष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न
लेखकाने केला आहे. ह्या कादंबरीतील जमेची बाजू म्हणजे व्यक्तिरेखांचा जिवंतपणा. व्यक्तींच्या हालचालींचे सूक्ष्म चित्रण अत्यंत
बहारदारीचे. पतंगराव क्रूर आहे, हिंस्त्र आहे. जनावरांच्या बाजारातला तो ड@डी. जनावरांपेक्षा जास्त किंमत तो माणसांना देत नाही. बापाने
पुरून ठेवलेल्या धनाच्या हंड्याला तो बाहेर काढतो तर आत नागराज व त्याची पिलावU. धनासाठी तो सर्पयज्ञच करतो.
द.स.काकडे हे नाव गेल्या दशकापासून मराठी कादंबरीला आणि वाचकाला परिचित होत गेले आहे. त्यांच्या लिखाणाला एक निश्चित असा
ठामपणा आहे. त्यांच्या कथानकातील पात्रे विशिष्ट असली तरी टाईप होत नाहीत. काकड्यांकडे संवेदनशक्ती आहे. पात्रांचा आवश्यक तेवढा
परिचय आहे. पात्र सजीव करण्याची त्यांची लेखनशक्ती अफलातून आहे.
३) लोकप्रभा: साप्ताहिक १०फेब्रूवारी,१९८०
द.स.काकडे यांनी सारा जन्म उन्हात या कादंबरीत साचेबंद ग्रामीणरंग न वापरता खेड्यातील गावरान रांगडेपणा, आपापसातील भांडणे,
स्त्रीसुलभपणा यांचे रम्य दर्शन घडविण्याचा प्रस्तुत कादंबरीत प्रयत्न केलेला आहे. कादंबरीत वडाराची सोनी, चंदर, बबी, तिची आई,
आनंदी, पतंग्या या सार्यांचे जीवन परिस्थितीच्या उन्हामुUे होरपUून निघालेले आहे. कादंबरीत व्यक्त झालेला संघर्ष इतका तीव्र आहे
की त्यामुUे वाचक कथानकात चक्रावून जातो. कादंबरीचे कथानक एवढे प्रभावी की तो कादंबरीत हरवून जातो.
४) नवाकाU - २८ जुलै,१९८०
एका निरपराध अजाण जीवाला परिस्थितीच्या तीव्र उन्हाÈयात कसे होरपUावे लागले, त्याची मनोवेधक कथा द.स.काकडे यांनी सारा
जन्म उन्हात या कादंबरीत रेखाटलेली आहे.

–––––––––-
द.स.काकडे - काही कादंबर्यांचे अंतरंग
१) कादंबरी रात्र अर्धी...चंद्र अर्धा - प्रसिध्दी - १९८० : प्रिया प्रकाशन, मुंबई
नंदिनी, तू स्त्री...मी पुरूष
पण आपण दोघेही आहोत फक्त स्त्री-पुरूष देहाच्या सावल्या
अरविंद बाबू, एका दु:खी माणसासारखे जगात दु:खी कुणीच नसते
नंदिनीनं अरविंद बाबूंकडं अनिमिष नेत्रांनी पाहिलं
नंदिनीनं हनुवटीवर करंगUी टेकवली
अरविंद बाबूंकडं आणि स्वत:कडं पहात ती बोलली-
रात्र अर्धी...चंद्र अर्धा...मी अपूर्ण स्त्री तर तुम्ही अपूर्ण पुरूष...
आणि त्यावर दोघे कितीतरी वेU हसत राहिले.
एकमेकांच्या गÈयात हात घालून ते बंगली बाहेर आले.
त्याचवेUी घड्याUात अर्ध्या रात्रीचा टोल पडत होता.
अर्ध वर्तुUाकार असलेला चंद्र अर्ध्या रात्रीशी भिडत होता.
––––––––––––––
२) कादंबरी दत्तक - प्रसिध्दी जून,२००३ - ज्ञानदत्त प्रकाशन, पुणे
एक इरसाल ग्रामीण कथानक असलेली कादंबरी. एक चेअरमन - त्याच्या दोन बायका. दोन्ही निपुत्रिक - म्हणून त्यानं ठेवलं एक
अंगवस्त्र! नेमका अंगवस्त्रालाच झाला एक मुलगा. तोच ठरला चेअरमनचा वारीसदार. पण त्याच्या दोन बायका, चार मुली. त्यांचे नवरे,
बाकी भाऊबंद, पै पाहुणे...
त्यांच्या पेच डावपेचातून चेअरमनला सुटता सुटता नाकी नऊ येतात. अखेर चेअरमनच्या बायकांच्या कारवाया पाहून चेअरमन आपल्याच
मुलाला दत्तक म्हणून स्वीकारतो. असा गुंता सुटतो - पण हा गुंता कसा कसा सुटतो त्याची ही इरसाल कहाणी.
३) माU हा सरेना - प्रसिध्दी १९९१- प्रिया प्रकाशन, मुंबई.
पूर्वीचे निसर्गरम्य गाव तेथील माणुसकी जपणारे लोक...सारे बदलले आहे. बेरकीपणा, संधीसाधू राजकारण आणि मतलबीपणा वाढलेला.
घरातच भाऊबंदकी वाढलेली तेथे गावकीत काय? बदललेल्या खेड्याचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. ही कादंबरी लेखकाचेच आत्मचरित्र आहे.
कादंबरीचा नायक मुंबईत राहून गावच्या आईवडील, भाऊ बहिणीसाठी जीव तोडतो. त्यांना सुखात ठेवण्यासाठी धडपडतो. पण शेवटी
कोसUून पडतो. कवी रेंदाUकरांच्या माU हा सरेना ह्या कवितेचे नावच लेखकाने कादंबरीला दिलेले आहे. कादंबरीभर सारा माUच
पसरलेला. हिरवU नाही. सार्या ओसाडपणाचे दु:ख ह्या कादंबरीत मांडलेले आहे.
४) कादंबरी घरभेदी - प्रसिध्दी -२००० : पार्टनर पब्लिकेशन्स, मुंबई
लेखकाने आमच्या पन्नास माणसांच्या एकत्र कुटुंबातील जानकी आजी आणि यशोदा आत्यांच्या स्वाभिमानी स्मृतीस ही कादंबरी अर्पण
केलेली आहे. ही दोन पात्रेच ह्या कादंबरीतील प्रमुख नायिका आहेत.
कुटुंबातील एक सज्जन भाऊ व वाटपाचा आग्रह करणारे तीन घरभेदी लबाड भाऊ यांचे सुरेख चित्रण या कादंबरीत करण्यात आले आहे.
मनाची पकड घेणारी ही दर्जेदार बोधप्रद कादंबरी प्रत्येक कुटुंबाने वाचावी अशीच आहे. घरभेदी ही कादंबरी नवीन आवृत्तीत सख्खे भाऊ
ह्या नावाने कादंबरी प्रांतात आलेली आहे. प्रथमेश पब्लिकेशन्स ह्या कोल्हापूरच्या प्रकाशन संस्थेने डिसेंबर, २००९ ला ही कादंबरी प्रसिध्द
केलेली आहे.
५) कादंबरी घमंडी - प्रसिध्दी २००३ : पायल पब्लिकेशन्स, पुणे.
लोकप्रिय कादंबरीकार बाबा कदम यांना आबडलेली ही कादंबरी. त्यांनी पत्र पाठवून द.स.काकडे यांचे कौतुक केलेले आहे. ते लिहीतात- प्रिय
काकडे, तुम्ही एक इरसाल माणुसकी हरवलेल्या चेंगट, कवडीचुंबक, पाषाणहृदयी माणसाची व्यक्तिरेखा घमंडीत रंगवलेली आहे. खेड्यातील
वातावरण, भाषा अस्सल आहे. तुम्ही मुंबईत राहाणारे लेखक पण तुमच्या कादंबरीला खेड्यातील मातीचा अस्सल वास आहे, कारण तुम्ही
अस्सल ग्रामीण लेखक आहात.
६) कादंबरी बापलेक - प्रसिध्दी - २००० चंद्रमौUी प्रकाशन, पुणे.
लेखकाच्या जीवनाचाच भाग असलेली ही कादंबरी. त्याचे आणि बापाचे व्यक्तिचित्रण कमालीचे सजीव आहे. कादंबरीचे कथानक झपाटून
टाकणारे आहे. कादंबरीतील खलपात्रे बाUशाबाबा, आबुराव, उध्दव, श्यामराव वाटपाच्या निमित्तानेकसा स्वार्थी खेU खेUतात. पण
कथानायक आणि त्याचा बाप किती सहनशीलपणा दाखवून सामना करतात. साराच अजब खेU. एकमेकांवर जीव टाकणार्या बापलेकाची ही
कहाणी हृदयस्पर्शी झालेली आहे.
७) कादंबरी- खेड्यामधले घर कौलारू- प्रसिध्दी १९७९: बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.
बहारदार निसर्गाच्या पार्श्वभूमीवरील ही मस्त कादंबरी. कथालेखक लेखनासाठी खेडेगावात येतो. तेथे त्याला जे सत्य जाणवते त्याचे चित्रण
लेखकाने सहजपणे केलेले आहे.
खेड्यामधली दोन कौलारू घरं लेखकाने पाहिली. एक चंदामावशीचं, दुसरं फुलामावशीचं. एक स्वत:च्या गैर कर्तृत्वानं मिUवलेलं. एक शुध्द
वर्तणुकीतनं मिUवलेलं.
खेड्यामधलं घर कौलारू, हे ऊन पाऊस ह्या सिनेमातलं गाणं ऐकताना लेखकाला ही दोन्ही घरं दिसतात. त्यातलं फुलामावशीचं घर
श्रध्दाशील वाटतं. लेखन करायला तेच घर त्याला योग्य वाटलं. घर हे पहिलं मंदिरासारखं असावं, म्हणजे तेथे कोणीही आला तरी त्याला
तेथे आनंद मिUतोच, हे लेखकाने मांडलेले आहे.
८) कादंबरी - सात एकर जमीन - प्रसिध्दी १९८७ : बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.
लेखकाची ही सर्वात आवडती कादंबरी. एकत्र कुटुंबातील कुटुंब प्रमुखाने ही जमीन आपल्या बायकोच्या नावे लबाडपणे लावली. वाटप
प्रकरणात महसुल कचेरीत तिच्या सातबाराचा शोध लागला. कोर्टकचेर्या हाणामार्या झाल्या. आठ वर्षे ही जमीन पडीक पडली. सात एकरात
बाभUरान माजलं. निकाल लागला. खेडेगावात जमिनीसाठी लोक काय काय खेU खेUतात ह्या खेUाचे लेखन ह्या कादंबरीत आहे.
लेखकाच्या घरातीलच ही सत्यकथा असल्याने ही वास्तव कहाणी वाचून वाचक अस्वस्थ होतो. लेखकाची नाU ह्या सात एकर जमिनीशी
जोडलेली आहे, त्यामुUे तो ती विकत घेतो. सुखी माणसाचा सदरा अंगात घातल्याचा तो आनंद घेतो.
९) कादंबरी - माणूस - प्रसिध्दी १९९९ : एस.के.पब्लिकेशन्स, पुणे.
लेखकाने ही कादंबरी आत्मचरित्रात्मक कादंबर्या लिहीणार्या आनंद यादवांस अर्पण केलेली आहे. ह्या माणूस कादंबरीतील माणूस म्हणजेच
लेखकाचा बाप. अफलातून जीवन जगणार्या बापाची ही कथा. ब्रिटीश काUात रा@केलधंदा करणारा हा माणूस अक्षरश: पैशात लोUतो.
पण निर्मोही वृत्तीचा. कसलेच भय न बाUगणारा. चुलत्याने फसवून त्याला मुंबईच्या धंद्यातून उडवला तरी समाधानात जगणारा.
विहीरीवर पाण्याने भरलेला हंडा उचलताना तो हंडा घेऊन पडतो. पोट फाटते. हा@स्पिटलमध्ये अ@डमिट व्हावे लागते. हगणे, मुतणे बंद
होते. आ@परेशन होते. बाप जगणार नाही, हे डा@क्टर लेखकाला सांगतात तर अंथरूणावर काहीसा शुध्दीवर असलेला बाप डा@क्टरांना
सांगतो, डा@क्टर, मी तुम्हाला जगून दाखवतो. जबर्दस्त इच्छाशक्ती असणारा मनुष्य काय चीज असते, हे सारे चित्रण ह्या कादंबरीत
आहे.
१०) कादंबरी - नागसर्प - प्रसिध्दी १ जून, २००६ : वैशाली प्रकाशन, पुणे.
सईबाई, गोपाUा तुमच्याशी कसा खेUला आहे हे आज तुम्हाला समजले आहे. आता तो मंजुUेच्या जिंदगीशी खेUायला निघालाय.
तुमच्या घरदार शेतीवाडीच्या हिश्श्यावर जसा त्याचा डोUा आहे. तसा आता मंजुUाचं लग्न करताना किती पैसा हातात मिUतोय हा डाव
खेUतोय तो.
गोपाU हाच खरा नागसर्प - हे सर्वांना कUून चुकतं. बहिणीची इस्टेट आपल्याला मिUावी म्हणून विहिरिच्या पाण्यात पोहणार्या
मेहुण्यावर नागसर्प सोडणारा गोपाUा... त्याचा तोच नागसर्पाचा खेU त्याच्यावर उलटविणारा सपेरा तिरम्याबाबा...गÈयाला विUखा मारून
दंश करणार्या नागसर्पाची ही कहाणी वाचावी अशी.
११) कादंबरी - खासदार - प्रथमावृत्ती २००२, द्वितीयावृत्ती २०१६ शांती पब्लिकेशन्स, पुणे.
खासदारमित्रा, एवढा पैसा आणलास कोठून?
ते ऐकलं आणि अण्णा खदखदा हसला.
लेखकमित्रा, दोन वेUा आमदार होतो. आता खासदार... ह्या पंधरा वर्षात हा अण्णा काय मUकूट खादीची कापडं आणि टाचेला झिजलेली
चप्पल घालून हिंडणार काय? महाराष्ट्राचे सी.एम. आणि भारताचे पी.एम.... ह्यांना मी भेटणारच ना? बड्या बड्या लोकांची कामे
त्यांच्याकडून करून घेणार. सारा पैसाच पैसा... बँक अकाउंट फुल.
खासदार अण्णा हे पटत नाही. पूर्वी तू जुन्नरच्या पार्टी आ@फिसात डोक्यावर लाल टोपी घालून लोकांची कामे करायचास-
मी आता मुंबईत बिहारी खासदाराचा मलबार हिलचा पÌल@ट घेतलाय.
अण्णा
लेखका, दिल्लीच्या यमुनेचं पाणी वेगUच रे...ते प्यालं की गावच्या नदीचं पाणी मचूU वाटतं बघ... खासदार झालं की संस्थानिकांचा बाप
झालोय, असं वाटतं बघ-
भ्रष्ट राजकारणीचं अंतरंग उलगडून दाखविणारी भेदक कादंबरी.

१२) सुत्रधार - प्रसिध्दी २००३ : सत्यजय प्रकाशन, मुंबई - लोकनेता- नवेरूप - प्रसिध्दी २००९ अजब पब्लिकेशन्स, कोल्हापूर
सहकारी साखर कारखानदारीतील गटातटाचे राजकारण चेअरमन, संचालकमंडUातील खो खो चा चाललेला एकमेकाला उठवण्याचा खेU.
त्यात बUी तो किंग. ग्रामीण राजकारणाचे चित्रदर्शी पध्दतीने लेखकाने खेUवले आहे. एकमेकांचे पाय ओढणारे ग्रामीण भागातील
तथाकथीत पुढारीच सुत्रधाराचे खेिUले झाले आहेत.
बलात्कारीत रत्ना, धीट वृत्तीची माधवी, खासदारांचे जावई आणि सत्ताधीशांच्या घरात बंदिस्त असलेल्या मूक स्त्रीया या सार्यांचे प्रखर
चित्रण मनाला अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाही.
१३) कादंबरी - नवे पाणी - प्रसिध्दी - १९८५ : बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.
जुन्या नव्याचा संघर्ष हा वर्षानुवर्षे चालला आहे. आज जे नवं असेल तेच उद्या जुनं असतं. मग पुन्हा नव्याचा जन्म, पुन्हा नव्या
जुन्याचा संघर्ष. प्रत्येक पिढीबरोबर नवं नवं जन्म घेत असतं. नव्या जुन्यानं जमवून घ्यायला हवं. जुन्या नव्याचा संघर्ष रंगवणारी ही
कादंबरी.
१४) कादंबरी - वंश - प्रसिध्दी १९९७ : चंद्रमौUी प्रकाशन, पुणे.
अग गौरा तशी मोठ्या मनाची ग... तिला मुलाची खूप ओढ. पण मी तिला मूल देऊ शकलो नाही. म्हणून तिनं घटस्फोट घेतला. पण ती
मोठ्या मनाची म्हणून तिनं घटस्फोटाचं कारण कोर्टात वेगUं दिलं... तिनं नवरा नामर्द म्हणून नव्हे तर तो बाहेरख्याली म्हणून कारण
दिलं...
बस, समजल सारं... मला काही सांगू नका.
अग, गौराला माPया रक्ताचं मूल हवं होतं... पण मी... तिला दत्तक मूल घेण्याचा प्रस्ताव दिला. पण तिनं तो नाकारला, घटस्फोट
घेतला तिनं कोर्टातनं. आता ती मूल नाही म्हणून वेडी झालीय. दारू प्यायला लागलीय...
तुमच्या गौराचं नाव माPया नव्या संसारात नकोय.
सुलू, तू गौरासारखी घटस्फोट तर घेणार नाहीस ना? वंशाला दिवा नाही म्हणून तू गौरासारखी वेडी तर होणार नाहीस ना?
एका सदवर्तनी पुरूषाची जिवाची घालमेल करणारी कहाणी.
१५) कादंबरी - चांदणी - प्रसिध्दी १९८३: गुलमोहर प्रकाशन, कोल्हापूर. दुसरी आवृत्ती २०१६: शांती पब्लिकेशन्स, पुणे.
आकाशात चंद्र वर आला होता. समोर पसरलेला तो समुद्र आणि त्याच्या त्या काठावर उभे असलेले ते प्रेमी जीव. समुद्राला उधाण येत
होतं. त्यांच्यातील भावनांनाही उधाण आलं होतं.
चांदणीनं आकाशात पाहिलं. एक तेजस्वी चांदणी चंद्राकडे सरकत होती. ते अ@स्टिन रिबेरानं पाहिलं. अनावर होऊन त्यानंही चांदणी
भोवताली आपले हात गुंफले. चांदणीच्या ओठावर कधी नव्हे ते गाणं आलं. तू मेरा चांद, मै तेरी चांदणी.
दु:खी चांदणीच्या जीवनात चांदणं पसरविणार्या तरूणाची सुखद कहाणी.
१६) कादंबरी- निवडणूक - प्रसिध्दी २००९: अर्पिता प्रकाशन, पुणे.
होय, लोकसभेच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेUी घेतली मी घोडे बाजारातली माझी किमत आणखी काही ऐकायचंय... लोकसभेची पुढची
निवडणूक येईपर्यंत पोत्यानं पैसा कमवायला हवा.
खासदार हर्षवर्धन, तू म्हणे गोव्यात एका किरीस्ताव बाईचा बंगला तिच्या जमिनीसकट घेतला, तिची हत्या की आत्महत्या, आवाज
उठतोय. तुझं नाव घेतलं जातंय. अशी बातमी उद्या आली तर -
लेखक, तूच तुPया राजकिय कादंबरीत लिहीलसना... राजकारण म्हणजे बदमाशांचा अ·ा...
अरे, तू सत्तधारी पार्टीचा खासदार नाहीस. संघर्ष करणार्या जनसंघर्ष पार्टीचा तू एकमेव खासदार ... माझा मित्र म्हणून मी तुला-
लेखका, तुला काय म्हणायचंय, ते तुPया पुस्तकात लिही...
खासदार, तुPयासारख्या बदमाश मित्रापासून जपायला हवं, दुसरं काय.
१७) कादंबरी - पाखर्या - प्रसिध्दी २००० : युनिटी प्रकाशन, पुणे
पाखर्या घोडदौड करीतच जंगल पट्टीत गेला. मोगा त्याच्या प्रेमात होती. जंगलपट्टीतल्या बेहड्याच्या झाडाखाली हैदर्या थैथया नाचतच त्या
दोघांकडे पाहत होता. खिंकाUत होता. मोगा तू जंगलच्या आमदाराची लेक आहेस. मी हा असा फाटका. तुPया मोठ्या घराला काU लावू
नकोस.
पाखर्याच्या पराक्रमानं त्याच्या दिलदार वागण्यानं मोगा त्याच्यावर लट्टè होते. पण रंगनाथरावाशी मोगाचं लग्न झालं. तिच्या डोÈयातनं
अश्रु वाहत होते. जाताना ती आमदार बापाला बोलली मी रंगनाथरावाशी लग्न केलं नाही, माझं लग्न पाखर्याशी झालंय असंच समजते.
रंगनाथरावलाच मी पाखर्या समजणार... त्याला पाखर्या म्हणूनच हाक घालणार.
लग्न मंडप घातलेल्या वाड्याकडे पाखर्याचा हैदर्या घोडा चौफेर उधUत येत होता. पण त्याच्या पाठीवर पाखर्या नव्हता...
जंगलपट्टीच्या पार्श्वभूमीवरील एक तेज प्रेमकहाणी.
१८) कादंबरी - जिंदगी - प्रसिध्दी १९९६: राजमुद्रा पब्लिकेशन्स, पुणे. दुसरी आवृत्ती २००५: सत्यजय प्रकाशन, मुंबई.
तिसरी आवृत्ती २०१६: शांती पब्लिकेशन्स, पुणे
कलावंतांची अनोखी जिंदगी जगणार्या कलावंताची ही दिलचस्प कहाणी. लेखकाने ही कादंबरी कवीमित्र नामदेव ढसाU आणि मल्लिका
अमरशेख यांना अर्पण केलेली आहे.
१९) कादंबरी - जखम - प्रसिध्दी २००९: चंद्रमौUी प्रकाशन, पुणे.
मृतावस्थेत पडलेल्या शामकांतच्या चेहर्यावरनं मी हात फिरवला. त्याचे डोUे उघडे होते. ते मी झाकू पाहात होतो. त्याच्या उघड्या पापण्या
बंद होईनात. माPया डोÈयातनं सांडणार्या अश्रुंनी त्याचे डोUे भरले. मृतावस्थेतही तो अश्रुभरल्या डोÈयांनी माPयाकडे पाहात होता.
दोस्तीची टचेबल कहाणी.
२०) कादंबरी - छबिना - प्रसिध्दी १९८५: बांदोडकर पब्लिकेशन हाऊस, गोवा. दुसरी आवृत्ती २०१३: शांती पब्लिकेशन्स, पुणे.
छबिना म्हणजे देवीच्या पालखीची मिरवणूक. देवीची काठी मिरवणुकीत नाचवली जाते. ढोल, लेझीम, टिपर्या, बँडच्या तालावरचा बेभानपणे
नाचली जाणारी तरूण पिढी. अंगात देवीचा संचार झाल्याने लिंबाचा झाडोरा हातात घेऊन पालखीपुढं नाचणारे स्त्री पुरूष. पुरूषांपेक्षा
बायकांची जास्त संख्या. छबिन्यालाच जोडून दुसर्या दिवशी होणार्या पैलवानांच्या तांबड्या मातीतल्या कुस्त्या. कुस्तीच्या आखाड्यासाठी
आलेला पैलवान आनंदराव आणि गावातील तारूण्यात बहरलेली सुंगता ह्या दोघांची छबिन्यात गाठ पडते. सुगंताच्या मुठीतला गुलाल
आनंदरावावर चुकून उधUला जातो. मग होणारी त्यांची अचानक भेट. ह्या भेटीचे वर्णनही धुंदफुंद शब्दातलं. आनंदराव, हे शरीर अजून
तसच हाय. त्याला कोन्हाची नजर लागू धिली न्हायं. म्या हा असा दांडगा पैलवान. मला तुPयासारखीच दाणगट तरणी पोर पाह्यजी
व्हती. बा ला ती मिUत नव्हती. मग बाला म्याच म्हणलं, मला मिUाली तर पाह्यतो... तर तूच मिUालीस-. म्हजी छबिन्यात म्या
गुलाल उधUला ते बेस केलं -
कादंबरी वाचायला घेतली की खाली ठेवता येत नाही, हे तिचं यश.
२१) कादंबरी - बुलबुल्या - प्रसिध्दी २००२: पार्टनर पब्लिकेशन्स, मुंबई.
बुलबुल्या नाव ठेवा की गोजाबाईनं नाव सुचवलं. पाUण्यात रडणार्या पोरानं बुलबुल्या नाव ऐकताच रडणं थांबलं. ते हसाय लागलं. तोंडाचं
बोUकं दाखवाय लागलं.
गोजाबाय, तुला पोराचं नाव बुलबुल्या कसं ठेवावसं वाटलं. पोराची आई बोलली.
मला धा पोरं झाली. धा पोरांची नावं मी नाय ठेवली माPया पैलवान नवर्यानं ठेवली.
म्हंजी पैलवान नवरा चांगला पंचाग बघणारा बाम्हण म्हणायचा
पंचागी बाम्हण कसला? त्यानं कुस्तीत आतापर्यंत जेवढे पैलवान पाडले. त्या समद्यांची नावं त्यानं आमच्या पोरांना ठेवली. त्यातल एका
पैलवानाचं नाव बाकी होते. पण मी धा पोरानंतर पोर होऊ धिलं नव्हतं.
असं! मंजी तुमच्या अकराव्या पोराला जे बुलबुल्या नाव धिलं गेलं असतं ते ह्या आमच्या रडणार्या पोराला धिलं, म्हणा की, गोजाबाय.
बुलबुल्याची आई बोलली.
- तर अशा ह्या बुलबुल्याची गमतीदार कहाणी ह्या कादंबरीत इरसालपणे मांडली आहे.
२२) कादंबरी - सोडिला मी गाव - प्रसिध्दी २००६: पायल पब्लिकेशन, पुणे.
आई-बाबा, मी आता मुंबईस निघतो, गाव सोडतो.
जा, तू. आम्हाला घर, शेती आहे-
विधवा सुनेला माहेरी हाकललं तुम्ही - कोर्टात जाईल ती.
कोर्टात आम्ही सांगू. आमचा थोरला मुलगा मेला, तशी ही सून बी आम्हाला मेली.
आईबापाचं बोलणं माPयासारख्या लेखकाला पटणारं नव्हतं. वहिनीच्या माहेरी जावे, तिला समजून सांगावे.
मी तिच्या माहेरी निघालो, तर पाय ठेचाUले. डोÈयासमोर देऊ उभी राहिली. अंतरातलं पाणी ढवUलं. देऊ... वहिनीची धाकटी बहिण,
माझी गोरी मेहुणी... मोठी गोड पोर.
मुंबईहून गावी गेलं की तिकडं एक फेरी व्हायची. कारण? ती मला द्यायची ठरली होती. तिला मी पाह्यलं की मोहरून निघायचो. मी
बी.ए. करीत होतो. लग्नासाठी दोन वर्षे त्यांना थांबा म्हणालो. कारण नोकरी करून मी बी.ए. करीत होतो. पण वहिनीच्या माहेरचे थांबले
नाहीत. लग्नाची घाई केली.
देऊ, तिचं काय?
ती सासरी रमली नाही. माहेरीच निघून आली. वहिनीच्या माहेरी निघालो तेव्हा पाय ठेचाUण्याचं हेच कारण... देऊ आणि मी...
आता कोणत्या नात्यानं आम्ही दोघं समोर येणार होतो.
माPयामुUे ती आणखी बदनाम होणं मला आवडणारं नव्हतं.
२३) कादंबरी - घायाU - प्रसिध्दी १९९३: बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. दुसरी आवृत्ती अजब पब्लिकेशन्स, कोल्हापूर
सावUा आठ महिन्याचा पोटात असताना बैजूला नवर्याला महारोग झाल्याचं कUलं तेव्हा ती हबकली. नवर्याला महारोग झाल्यानं त्याचा
देखणेपणा गेला, त्याच्या शक्तीलाच ग्रहण लागलं. नागराजाला अंगावर डसवून घेतला तर विषानं महारोग जाईल, असं वैदूनं उपाय
सांगितला. ते ऐकून तिचा नवरा पUालाच. नागराजाच्या विषाची परीक्षा घ्यायची म्हणजे मरणच की. नवरा पUाल्यानंतर देखण्या बैजूला
जे भोग आले, तिची ही घायाU कहाणी.
२४) कादंबरी - पानझड - प्रसिध्दी नोव्हेंबर, २००६: ज्ञानदत्त प्रकाशन, पुणे.
पानझड चा विषय लेखकाच्या लग्नापूर्वीचा. त्याच्या का@लेज जीवनात, त्याच्या शिक्षक-प्राध्यापक जीवनात ज्या ज्या मैत्रिणी आल्या,
त्यांच्या सहवासातील मोकUेपणा, जवUीकपणा ह्या पानझड कादंबरीत आला आहे. सर्वांशी प्रामाणिकपणाने वागले तर स्नेह लाभतो.
प्रेम लाभे प्रेमUाला. लेखकाला असे मैत्रिणींचे जे खूप प्रेमU प्रेम मिUाले, त्याची ही नितU कहाणी.
२५) कादंबरी - सन्यस्त - प्रसिध्दी २०००: एस्सेल प्रिंटर्स, पुणे
स्त्री काय, पुरूष काय? आत्महत्या का करतात? जगण्याचा मार्ग संपला की त्यांना आत्महत्या करावीशी वाटते. जीवनावरचा, जगण्यावरचा
विश्वासच उडाल्यावर कोण जगेल? संसारापासून पUणार्या स्त्री-पुरूषांचं तरी काय? राजपूत्र सिध्दार्थनं का गौतमबुध्द होण्यापर्यंतचा प्रवास
करावा? संन्यस्तांचा प्रवास लेखकाला मोहविणारा. सर्वसामान्य जीवन जगणार्या अशाच एका संन्यस्ताची ही कहाणी अंतर्मुख करते.
२६) कादंबरी - केUीचे सुकले बाग - प्रसिध्दी १९९८: शांती पब्लिकेशन्स, पुणे.
लेखकाने बंगाली कादंबरीकार शरदबाबूंच्या देवदास आणि पारोस ही कादंबरी अर्पण केलेली आहे. देवदास आणि पारो ह्या एकमेकांचा ध्यास
घेतलेल्या जिवांसारखीच ही एक प्रेम कहाणी. मन विव्हU करणारी ही कथा वाचायलाच हवी.
२७) कादंबरी - कल्याणी - प्रसिध्दी १९८५: बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा.
कल्याणच्या गुलमहालची कोठावाली नूरजान ही तरूण मुलींना पUवून धंद्याला लावणारी बाजारबसवी.
गुलमहालवर पोलीस धाड पडली. त्या कुंटणखान्यात दहाबारा मुलींची सुटका करण्यात आली. त्यातलीच एक देखणी कल्याणी. फौजदार
सहाणेंनी कल्याणीला आपल्या जीपमध्ये बसवून नारायणगाव पोलीस ठाण्यात आणलं तर तेथे पोलीस कोठडीत कोठीवाली नूरजान. तिला
पाहून कल्याणी ओरडलीच - नूरजान.
देखण्या कल्याणीची मनाला सुन्न करणारी कहाणी.
––––––––––––-