|
|||||||
Published Books - प्रकाशित पुस्तके |
|||||||
|
लेखक - द. स. काकडे, कथा |
|
|||||
अनु. क्र. |
मुखप्रुष्ठ |
पुस्तकाचे नाव |
परिक्षणे |
||||
001 | मु-हाळी |
द. स. काकडे यांच्या मुर्हाळी कथासंग्रहावरील काही परिक्षणे- १) मराठा-रविवार पुरवणी-२७ डिसेंबर,
१९७०:संपादक-आचार्य अत्रे २) माणूस - साप्ताहिक १४ ऑक्टोबर,
१९७०: समीक्षक सौ.पुष्पा भावे
४) महाराष्ट्र टाईम्स रविवार आवृत्ती २४
जानेवारी, १९७१: ५) नवाकाळ - २७ डिसेंबर
१९७० ६) धनुर्धारी मासिक ऑक्टोबर, १९७०:
वामन होवाळ ७) साहित्य सहकार मासिक - ऑक्टोबर,
१९७०: वि. वा. हिरे ८) तरूण भारत - रविवार आवृत्ती १३
सप्टेबर, १९७० ९) आलोचना - समीक्षाप्रधान अंक - जून,
१९७१ १०) मुर्हाळी - प्रस्तावना - ल. ग.
जोग |
|||||
002 | गोरी मेहुणी |
गोरी मेहुणी - कथासंग्रह प्रसिध्दी १९८२ मानवी भावभावनांचा वेध घेणारा हा कथासंग्रह वाचकांच्या चांगलाच
पसंतीस पडला. |
|||||
003 | रात चांदणी |
रातचांदणी - प्रसिध्दी डिसेंबर, १९९६ कथाकादंबरीकार जयंत दळवी यांच्या अनोख्या स्मृतींस हा कथासंग्रह लेखकाने अर्पण केलेला आहे. सर्वच कथा वेगवेगळा आनंद देणार्या. |
|||||
004 | कुकडी काठच्या कथा |
कुकडीकाठच्या कथा - प्रसिध्दी मार्च, १९९८ वर्गहीन - वर्णहीन दलित शोषितांच्या आभाळभर दु:खास कथाकाराने हा कथासंग्रह अर्पण केलेला आहे. जुन्नर तालुक्यातील कुकडीकाठच्या प्रदेशाची पार्श्वभूमी कथांना लाभली असली तरी अन्य प्रदेशातही अशा प्रकारचे जीवनानुभव येऊ शकतात म्हणून ह्या कथासंग्रहाला प्रादेशिकतेच्या चौकटीत बसविण्यात अर्थ नाही. कुठल्याही चळवळीच्या झेंड्याखाली न येता द.स.काकडे हे कथाकार म्हणून तटस्थपणे लेखन करीत असल्याचे दिसते. एकूण २० कथांचा संग्रह. स्वातंत्र्योत्तर काळातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरातील दैन्याचे चित्रण पंधरा ऑगस्टचा दिस ह्या पहिल्याच कथेत समर्थपणे रेखाटले आहे. कथानिवेदन करणारा स्वातंत्र्यसैनिकाचा पोरगा कथेत आपल्या शाळेतील झेंडावंदन करताना म्हणतो - पाठीमागे फाटलेल्या चड्डीतून बाहेर पडलेल्या माझ्या गरीबीच्या झेंड्याला फडकावत कसातरी उभा होतो. एक पाणवठा कथेत शासनाच्या विकास योजनांचा बोजवारा कसा उडाला याचे प्रातिनिधीक चित्रण आहे. रक्त कथेत जन्म देणार्या आईवडिलांपेक्षा धनिक - श्रीमंत अशा नव्या सग्यासोयरांना जवळ करणारी पिढी यांच्यातील संघर्ष अभिव्यक्त होतो. गटारी अमोशा सारख्या कथेतून गावातील चांडाळ चौकडीचा बेरकीपणा द.स.काकडे चित्रित करतात. तांबडी माती तून पैलवानाच्या रणदार तयारीचे चित्रण आहे. भोग वेगÈया वळणाची कथा आहे. हेडी रांगड्या भावाचं चित्रण करते. मुके दु:ख कथा मुक्या तरूणासोबत विवाह झालेल्या तरूण स्त्रीची कथा काळजात कालवाकालव करते. हुंदका मध्ये आणीबाणीच्या काळातील कुटूंबनियोजनाचा बोजवारा कसा उडाला ह्याचे भेदक चित्रण करते. कुंकू कथा व्यसनाधिनता, बुवाबाजी आणि स्त्रीच्या पतीनिष्ठेचे नव्हे तर तिच्या रौद्र रूपाचे चित्रण करते. सारांश - कुकडीकाठच्या कथा मुळातूनच वाचाव्यात एवढ्या त्या ताकतीच्या आहेत. |
|||||
005 | श्रावणधार |
श्रावणधार - प्रसिध्दी १९९९ श्रावणधारेतील ओल्याचिंब आठवणीतील पहिलीच कथा श्रावणधारा रसिक वाचकांना गायरानातल्या धुंद भुलभुलैयात गुंतून ठेवते. मनुष्य काय, प्राणी काय - तारूण्याच्या कैफात कसे धुंद होतात, मृत्यूला सामोरे जातात ह्यांची सनसनाटी कथा. सर्वच कथा मनाला हलवून टाकणार्या. |
|||||
006 | डोह |
डोह - प्रसिध्दी डिसेंबर, २००९ एकूण १७ कथांचा हा अपूर्व नजराणा. डोह ही कथा दो जिवांच्या
ताटातूटीची. तिचे लग्न होते मनाविरूध्द. त्यामुळे झालेला दुरावा. हा दुरावा नियतीने
केलेला. ती पिंजर्यातील, तो पिंजर्याबाहेर. दोघांची नदी पाणवठा डोहावर भेट होते.
दोघेही जवळ असून दूर दूर. द.स.काकडे यांच्या डोह सारख्याच इतर कथाही अशाच भाव भावना हलवणार्या. घरंदाज, थोरला, सवाशीण, सोयरीक, शाण, मरण... शेवटची कथा स्वामी. ही कथा साक्षात्काराचा प्रत्यय देणारी. साध्या सोप्या सरळ शब्दात प्रभु रामचंद्रांचं दर्शन देणारी. प्रत्येक कथा वाचावी अशी. |
|||||
|