|
||||||||
Published Books - प्रकाशित पुस्तके |
||||||||
|
लेखक - द. स. काकडे व अशोक मेंगजी, कादंबरी |
|
||||||
अनु. क्र. |
मुखप्रुष्ठ |
पुस्तकाचे नाव | ||||||
001 |
बाजार प्रसिध्दी 1981, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. मराठीत स्त्री-पुरूष, पुरूष-पुरूष,स्त्री-स्त्री - - थोडक्यात स्त्री-वेश्या, पुरीष-वेश्या, होमो, गे, गिगेलो - नैसर्गिक, अनैसर्गिक शरीर संबंधावर आधारलेली ही पहिलीच कादंबरी. वाचकांना वेगळ्याच दुनियेत ह्या कादंबरीने नेले, त्यांना गुंगवून टाकले. त्यानंतर ह्या विषयावर ब-याच कादंब-या आल्या पण बाजार कादंबरीची उंची एकाही कादबरीला नाही. |
|||||||
002 |
पुनर्मिलन प्रसिध्दी 1986, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. ही एक काल्पनिक सहस्यमय कादंबरी |
|||||||
003 |
कामिनी प्रसिध्दी 1984, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. कामिनी .. एक सुंदर तरूणी. झोपडपट्टीतली गरीबी पाचवीला
पुजलेली पण तिच्याजवळ आहे. तिचं उत्तान, तरूण आकर्षक सुंदर शरीर .. ह्या सुंदर
शरीराच्या बळावर ती क्रिडापट्टूपासून नेता, अभिनेता, जुगारी .. सर्व प्रकारच्या
श्रीमंतांना भुरळ घालते. |
|||||||
004 |
आकांक्षा प्रसिध्दी 1983, बांदोडकर पब्लिशिंग हाऊस, गोवा. लो जवानी आ गयी अब खैर जवानोंकी नही |
|||||||
005 |
म्रुगजळ प्रसिध्दी 1980 प्रिया प्रकाशन, मुंबई. बंडू खेळणेचा चेहरा कुरूप. त्याला कुणीही तरूणी पहायला तयार नव्हती. पाह्यलं तर तिच्या चेह-यावर तिरस्कार. मग त्यानं ठरवलं. आधुनिक तंत्रानं चेहराच बदलायचा. बंडू खेळणे रस्त्यानं चालला तरी डोक्यात ऑपरेशनचाच विचार. चेहरा बदलणारा डॉक्टर भेटला तर? त्याची फी कशी द्यायची. योगायोगाने डॉक्टर जमकरांना बंडू खेळणे भेटला. फॉरिनवरनं ते स्क्रीन स्पेशालिस्टचं शिक्षण घेऊन आलेले डॉक्टर. त्यांनी प्लॅस्टिक सर्जरीनं अनेकांना नवा चेहरा दिला होता. पण तो परदेशात. त्यांना परदेशापेक्षा स्वदेशात नाव कमवायच होतं. त्यांच्या हाती बंडू खेळणे, एका अपघातात तो सापडलेला होता. त्याचा थोबडा पार फाटला होता. सिव्हील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जमकरांनी पाहिला. सरकारी हॉस्पिटलात बंडू खेळणे मरणार होता तर डॉक्टर जमकरांनी त्याला आपल्या हॉस्पिटलमध्ये नेला. "डॉक्टर, तुम्ही माझा चेहरा पार मुळापासून बदलून टाकणार
का प्लॅस्टीक सर्जरीनं?" बंडू खेळणे पार बंडू देखणे झाला. त्यानं आपलं नावच बदललं. तो देखणा तरूण म्हणून हॉस्पिटलबाहेर आला. तरूणी सुध्दा त्याला पाहून आकर्षित झाल्या. मग तो मनोहर काश्यप म्हणून बाहेर वावरायला लागला. तो कारनामे करायला लागला. तरूणींना प्रेमाचं नाट्य करून खेळायला लागला. अनेक जणींशी तो खेळला. तो इतका खेळला की त्यालाच ह्या इष्कबाजीचा कंटाळा आला. त्याचा पिच्छा तरूणी सोडीनात. आपण पुर्वीचे कुरूप होतो तेच बरे असे त्याला वाटले. पुन्हा तो अपघातात सापडल्यावर त्याला नेमके डॉक्टर जमकरांच्या हॉस्पिटलात नेले गेले. डॉक्टर जमकर स्क्रीन स्पेशालिस्ट म्हणून नावारूपाला आले होते. त्यांनी बंडू खेळणेला ओळखले .. डॉक्टरांनी त्याला थोपटले. बोलले, "बंडू खेळणे, तुम्हाला मी आता आहे ह्या चेह-यापेक्षाही देखणा चेहरा देतो." "डॉक्टर, मी पूर्वी होतो तसाच बरा .. मला माझा पूर्वीचा
कुरूप चेहरा हवा. म्हणजे मी देखण्या तरूणींना फसवणार नाही, त्या माझ्या मागे लागणार
नाहीत .." |
|||||||
006 |
अभिनेत्री प्रसिध्दी 1980 प्रिया प्रकाशन, मुंबई अशोक मेंगजी हे श्रीमंत व्यक्तिमत्व. फिल्म इंडस्ट्री, महालक्ष्मी रेस कोर्स, फाईव्ह स्टार हॉटेल्स सर्व प्रकारच्या श्रीमंती जिंदगीचा अनुभव त्यांच्या गाठीशी. तर द.स.काकडे हे शैलीदार लेखक. म्हणजे एका लेखकाचे जबरदस्त अनुभव तर दुस-या लेखकाची शैलीदार लेखणी - असा हा रंगीन मिलाप आहे. अभिनेत्री ही कादंबरी एका अभिनेत्रीची आहे. अभिनेत्री होण्यासाठी कितीतरी तरूणी स्वत:ला बेभानपणे फिल्म इंडस्ट्रीत झोकून देतात. पण त्यातल्या खरोखर कितीजणी अभिनेत्री होतात? त्यातल्या कितीतरी जणी फिल्मइंडस्ट्रीतल्या वासनेनं वखवखलेल्या लांडग्यांच्या तावडीत सापडतात. बर्बाद होतात. त्यातली एखादीच असंख्य टक्के टोणके खावून अभिनेत्री बनते. पण तीने दिलेले किती जबरदस्त असते - त्यासाठी वाचा. अभिनेत्री कादंबरी. |
|||||||
007 |
अत्रुप्ता प्रसिध्दी 1980 प्रिया प्रकाशन, मुंबई. अतृप्ता ही तृप्त करणारी कादंबरी, असं अनेक वाचकांनी लेखकांना पत्र पाठवून कळवलं. त्याकाळात मोबाईल नव्हते, फोन सर्वांकडे नव्हते. 1980 चा तो काळ. टीव्ही ही घरोघरी आलेला नव्हता. कादंब-यांना त्यामुळे वाचक खूप. मनोरंजनाचे तेच एक चांगले साधन होते. हिंदी फिल्मइंडस्ट्रीतील मिनाकुमारी ह्या अभिनेत्रीला जे दु:खाचे आयुष्य लाभले त्याच दु:खाची छाया ह्या कादंबरीतील वर्णन केलेल्या नायिकेवर पडलेली असावी असे वाटते. रस्त्यावरून चालणा-या लोखंडी ट्रामचा तो जमाना. अभिनेत्रीचे बालपण ह्या ट्रामच्या प्रवासातून होते त्याचे वर्णन वाचकांना मागच्या काळात घेऊन जाते. अभिनेत्रीचा पैशांसाठी हावरा बनलेला बाप, पैशांसाठी मुलीने काहीही, कोणतीही भूमिका करावी, ह्या मंताचा असल्याने तो अभिनेत्रीला बालपणापासून दु:खात लोटत राहतो. कविमनाची अभिनेत्री जिंदगीभर मूकरूदन करते. तिच्या जिंदगीत अलेला प्रत्येक अभिनेता तिला मोहजालात गुंतवतो. तिचं शरीर, तिचा पैसा सांर लुटत राहतो. परिणामी अभिनेत्री व्यसनात, दारूत बुडली जाते. तिला मग स्वत:ला सावरता येत नाही........ अशी ही अतृप्त असलेल्या अभीनेत्रीची कहाणी. |
|||||||
008 |
मायादेवी प्रसिध्दी 1980 प्रिया प्रकाशन, मुंबई. काही मोठमोठ्या नट्या सारी उमेद अनेक श्रीमंत पुरूष, प्रोड्युसर, अॅक्टर यांच्या मिठीत घालून शेवटी जवळ कोणी येईनासे झाले की शेवटी शादी करतात. आपल्यालाही आता असा एखादा वय उताराला लागलेला पुरूष पाहायला हवा, असं फिल्मी पत्रकार असलेल्या मायादेवीला वाटले. आपण आपलं मागचं बर्बाद आयुष्य विसरून जाऊ. आर्थिक बाब आता गौण होती. तिनं विवाहमंडळाशी संपर्क साधला. शंभरेक फोटो तिच्यापुढं ठेवण्यात आले. त्यातला तिनं एक निवडला. तिच्यापेक्षा श्रीमंतच होता. दिसायलाही चांगला. त्याला तिनं बंगल्यावर बोलावले. तिला पाहताच तिच्या सौंदर्यानं तो लगेच प्रेमात पडला. लग्नाला लगेच तयार झाला. लग्न धुमधडाक्यात साजरं झालं. लग्नाला सारी फिल्मइंडस्ट्री हजर होती. त्याशिवाय तिच्या आयुष्यात येऊन गेलेल्या कितीतरी श्रीमंत पुरूषांनी तिच्यावर अहेरांचा बर्षाव केला. फिल्मी पत्रकारांनी डोळे मिचकावून तिच्या नव-याला तिच्याविषयी सावध राहाण्याचा सल्ला दिला. मिलनाच्या पहिल्याच रात्री तिचा नवरा तिला स्पर्श करू लागला तर तिने त्याला छत्तिसचा आकडा करून झोपायला सांगितले. तिने असे कितीतरी मधूचंद्र साजरे केले होते. आता तिला त्यात गंमत उरलेली नव्हती. "स्वीटी डार्लिंग" रात्रभर तळमळत पडलेल्या तिच्या नव-याने
पहाटेला तिच्या अंगावर हात टाकत तिला गोड आवाज दिला. ते ऐकलं न तिच्या काळजाला कडकडून इंगळी डसली. ह्याच्या
सुखासाठी नोकरी करायची. "पिक्चर समाचार" साठी धावाधाव करायची. पुन्हा फिल्म
इंडस्ट्रीतल्या फिल्म पार्टीत ब्रॅंडी, व्हिस्की, बियर .. जे मिळेल ते ढासायचं. त्या
नशेतून बड्या अॅक्टर, अॅक्ट्रेसकडून गॉसिप कॉलमचं मटेरियल गोळा करायचं .. हे नको
म्हणून लग्न केलं तर हा हरामी नवरा ... |
|||||||
|